मित्रांनो!, आश्चर्यचकित झालात ना? होय!, अमीर खान एका ब्रिटिश महिला पत्रकारासोबत लीव इन मध्ये राहील्याने झाला हा बेकायदेशीर मुलगा. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आमिर खान’ ने आपल्या चित्रपट कारकिर्दीत बरेच यश मिळवले आहे. त्याने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली.
आमिर आपल्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दलही बराच चर्चेत राहिला आहे. विशेष असे की आमिरने दोन लग्नं केली आणि दोन घटस्फोटही. पण लग्नाआधीही आमिर खानची अनेक प्रेम प्रकरणे होती. होय … परंतु आपण त्याच्या एका प्रेम प्रकरणा विषयी कधीही ऐकले नसेल. आपणास कदाचित हे ठाऊकही नसेल की आमिरचे प्रेमसंबंध एका ब्रिटिश पत्रकाराबरोबर होते.
आमीरची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी किरण राव, पण त्या दोघींच्या दरम्यान आमिरच्या आयुष्यात आणखी एक महिला आली, जिच्याशी आमिरने कधीच नातं स्वीकारलं नाही. काही वर्षांपूर्वी एका जगप्रसिद्ध आणि प्रथितयश मनोरंजन मासिकात अशी बातमी आली होती की, आमिरला देखील एक बेकायदेशीर मुलगा आहे.
खरं तर एका ब्रिटिश पत्रकाराने आमिरला आपल्या मुलाचा बाप म्हणून घोषित केलेय. जेसिका हेन्स नावाच्या या ब्रिटिश महिला पत्रकाराने असा दावा केला आहे की २००४ मध्ये तिला झालेला मुलगा आमिर खानचा होता. महिलेने या मुलाचे नाव ‘जान’ Jaan असे ठेवले.
विक्रम भट्ट यांच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. तिने आणि आमिरने दीर्घकाळ लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये वास्तव्य केले होते आणि त्याचवेळी ती गर्भवती झाली, असा दावाही महिला पत्रकाराने केला आहे. आमिरने गर्भपात करायलाही सांगितले होते, परंतु तेव्हा ती काही या गोष्टीला सहमत झाली नव्हती.
नंतर जेसिका लंडनमध्ये राहायला गेली आणि तेथे तिने मुलाला जन्म दिला. तथापि, आमिरने सांगितले की, त्या महिलेशी आपले काही प्रेम संबंध नव्हते किंवा तो त्यांचा मुलगा नाही. त्यावेळी ही गोष्ट तिथेच दफन करण्यात आली होती. यातील सत्य कोणालाही कळू दिले नाही.
होय … सूत्रांच्या माहितीनुसार, ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आमीर ब्रिटिश पत्रकार जेसिका हेन्सला भेटला होता. या दरम्यान आमिर आणि जेसिका यांच्यात संभाषण सुरू झाले आणि हळू हळू दोघेही प्रेमात पडले. इतकेच नव्हे तर आमिर आणि जेसिकाने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली.
रिपोर्ट्सनुसार जेसिका तिच्या लिव्ह-इन रिलेशनमध्ये मुक्काम करताना गर्भवती झाली होती आणि आमिरला याची माहिती मिळताच त्याने जेसिकावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. असे बोलले जाते की, आमिरने जेसिकाला गर्भपात कर किंवा त्याच्याबरोबरचे संबंध कायमचे तोड असे स्पष्टपणे सांगितले होते. जेसिकाने गर्भपातास ठाम नकार दिला आणि ती लंडनला निघून गेली.
जेसिकाने १४ सप्टेंबर २००३ एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव ‘जान’ ठेवले. जेसिका एक गृहिणी बनून आपले आयुष्य जगत आहे. मीडियाने आमीरला जेसिका आणि तिच्या मुलाबद्दल अनेकदा विचारले पण आमिर या विषयावर कधीही उघडपणे बोललाच नाही.
रिपोर्ट्सनुसार आमिरचा हा मुलगा आता १७ वर्षांचा आहे आणि सध्या लंडनमध्ये मॉडेलिंग करतोय. जान व्होग यूके -२०१२ मध्ये देखील दिसला आहे. जेसिका एक ब्रिटिश पत्रकार असून तीने अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे. आमिरपासून विभक्त झाल्यानंतर जेसिकाने लंडनमधील व्यावसायिका विल्यम टॅलबोटशी लग्न केले. त्यांना तरूल्ला ही एक मुलगीही आहे.