aamhi-doghe-raja-rani-star-pravah-new-serial




Aamhi Doghe Raja Rani Star Pravah New Serial

आम्ही दोघं राजा राणी
१४ नोव्हेंबरपासून

स्टार प्रवाहची नवी रोमँटिक कॉमेडी मालिका
सहकुटुंब अनुभवावं असं निखळ मनोरंजन

अपोझिट्स अट्रॅक्ट् असं म्हटलं जातं आणि तसं झालं की होतं एक फ्रिक्शन आणि त्यातून उमलते एक गोड प्रेम कहाणी ! स्टार प्रवाहवर आम्ही दोघं राजा राणी‘ Aamhi Doghe Raja Rani  या मालिकेतून अशीच एका गोड जोडीची लोभस प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. येत्या  १४ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता ही मालिका सुरू होत आहे.

aamhi-doghe-raja-rani

पार्थ आणि मधुरा दोघं आपापल्या अतरंगी कुटुंबासोबत राहतात. एकत्र कुटुंबात वाढणाऱ्या त्यांचे आपल्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे पण त्यांचे नमुनेदार कुटुंबिय या दोघांच्या प्रेमकहाणीत जबरदस्त तडका देणार आहेत. अतिशय मनोरंजक असं कथानक तितक्याच खुमासदारपणे मांडण्यात आलं आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह पहावी अशी ही रोमँटिक कॉमेडी मालिका आहे.

mandar-kulkarni-dipti-lele-aamhi-doghe-raja-rani

Mandar Kulkarni Dipti Lele

संगीता राकेश सारंग यांच्या कॅम्सक्लबने या मालिकेची निर्मिती केली आहे. विजय पटवर्धन, समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर मालिकेचं लेखन करत असून, संचित वर्तक दिग्दर्शन करत आहेत. मंदार कुलकर्णी, Mandar Kulkarni   दीप्ती लेले Dipti Lele या देखण्या गोंडस जोडी सोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर,शीतल शुक्ल आदी विनोदी अभिनायात मुरब्बी  कलाकार यातील भूमिका साकारत आहेत.

mandar-kulkarni-dipti-lele-aamhi-doghe-raja-rani-poster

Vikta  Ka Uttar विकता का उत्तरहा हटके गेम शो, ‘गोठ,ग….सहाजणी’ g sahajani आणि नकुशी… nakushi तरीही हवीहवीशीया तीन मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता थांबायचं नायम्हणत स्टार प्रवाह‘ star Pravah उत्तम आशय आणि निखळ मनोरंजनासाठी आम्ही दोघं राजा राणीAamhi Doghe Raja Rani ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.त्याचे प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील असा स्टार प्रवाह वाहिनीला विश्वास आहे.

aamhi-doghe-raja-rani-tv-serial-poster

Aamhi Doghe Raja Rani star Pravah New Serial Logo

aamhi-doghe-raja-rani-tv-serial-logo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here