सध्या सर्वत्र लग्नसराईचा सिजन सुरू आहे. त्यात बॉलिवूडमध्ये होणार्या सेलेब्रिटींची लग्न, त्यांचे फोटो, विडिओ चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. अशामध्ये बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत-नेने राम बंधु & ने लग्नसराईनिमित्त बनवलेल्या कॅम्पेनमध्ये पारंपारिक अंदाजात झळकली आहे. एम्पायर स्पाईसेस अँड फूड्स लिमिटेड ने (ईएसएफएल) त्यांचा प्रमुख ब्रँड रामबंधु साठी हे कॅम्पेन बनवले आहे.आयुष्याचा परफेक्ट पार्टनर शोधण्यासह खाण्याची आवड जोपासणारा परफेक्ट टेस्ट पार्टनर शोधणे असा संदेश माधुरी दिक्षीत- नेने अनोख्या पद्धतीने देत आहेत. आयुष्य चटपटीत आणि कुरकुरीत बनवणारे हे टेस्ट पार्टनर म्हणजे राम बंधु चे स्वादिष्ट अचार आणि पापड!
माधुरी दिक्षीत-नेने राम बंधु ची ब्रँड अम्बॅसेडर असून आपला टेस्ट पार्टनर कॅम्पेनमध्ये लग्नसराईला साजेशा अशा
सुंदर लूकमध्ये दिसत आहे. टीव्ही, डिजीटल, सोशल मीडिया अशा विविध माध्यमांद्वारे हे कॅम्पेन राबविण्यात येत
आहे. भारतीय भोजनामध्ये अचार आणि पापड यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक भारतीयांच्या घरात हे आवर्जून
आढळतात. त्यांची सुरूवात कशी झाली, त्यांचे विविध प्रकार, ते बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या पदार्थांचे महत्त्व
आणि प्रत्येकाला असणारी आवड पाहता आम्हाला उत्तम दर्जाचे, वैविध्यपूर्ण श्रेणीतील अचार आणि पापड
बनवण्याची प्रेरणा मिळाली.असे ईएसएफएलचे व्यवस्थापकीय संचालक उमेश राठी म्हणाले.
ईएसएफएलअचार, पापड, मसाले, सॉस, चटणी या उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करते. राम बंधु ब्रँडच्या
माध्यमातून या उत्पादनांना जागतीक स्तरावर पोहोचवत नवनवीन बाजारपेठांमध्ये यांचा विस्तार करण्याचे त्यांचे
ध्येय आहे. परदेशातही या उत्पादनांची निर्यात केली जाते. ग्राहकांचे मन जिंकणे हे त्यांचे उद्दीष्ट असून देशातील
प्रत्येक स्वयंपाक घरात आणि भारतीयांच्या मना मनात स्वतःचे स्थान निर्माण करणे हे लक्ष्य आहे. गेल्या अनेक
वर्षांच्या सातत्याच्या प्रयत्नांतून आम्ही आमचा ब्रँड प्रस्थापित केला आहे. ब्रँड अम्बॅसेडर माधुरी दिक्षीत-नेनेसोबत
आम्ही या क्षेत्रात नवीन उंची गाठण्याचे उद्दीष्ट मनी बाळगले आहे. देशभर आमचा विस्तार होत असून हे कॅम्पेन
आम्हाला ग्रामीण तसेच शहरी भागातील ग्राहकांशी जोडण्यास मदत करेल अशी आशा आहे.असे ईएसएफएलचे
मार्केटिंग प्रमुख भानुदास गुंडकर म्हणाले.
ईएसएफएलच्या ब्रँड पोर्टफोलिओमध्ये राम बंधु, आरबीएम, टेम्पटीन आणि झायका या ब्रँड्सचा समावेश आहे.
भारतातील १४ पेक्षा अधिक राज्यांमधील बाजारपेठांमध्ये अर्ध्या दशलक्षाहूनही अधिक किरकोळ दुकाने, मोठ्या
प्रमाणावरील फिल्ड स्टाफ आणि वितरकांची विस्तृत साखळी असणारी सुसज्ज यंत्रणा आहे.