मित्रांनो!, आज आयुष्मान खुराणाचा ३६ वा वाढदिवस. (१४ सप्टेंबर १९८४, चंदिगढ) बॉलीवूडच्या या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण यश मिळविण्यासाठी धडपड करत असतो. परंतु प्रत्येकालाच यश मिळतं असे नाही. त्यामुळे अभिनय क्षेत्रात एंट्री करण्याच्या निर्णयावर घरातूनच विरोध असतो. असेच काहीसे आयुष्यमान खुराणासही घडले होते. अभिनय क्षेत्रातच करिअर करायचे असा निर्धारच आयुष्यमानने केला होता.

Mumbai: Actor Ayushmann Khurrana during an interview for film “Toffee” in Mumbai on Oct 12, 2017.(Photo: IANS)

मात्र आयुष्मानच्या आजीला त्याचा हा निर्णय मान्य नव्हता. जेव्हा त्याच्या आजीला त्याला अभिनेता व्हायचे असल्याचे कळलं होते, तेव्हा आजीने त्याच्या चक्क कानाखाली लगावल्याचे त्याने सांगितले. अभ्यासात मी हुशार होतो, त्यामुळे अभिनयाच्या नादी लागून मी वाया जाऊ नये असं त्यांना वाटायचं. मात्र मला घरातून कधीच प्रोत्साहनाची कमी जाणवली नाही. नाटकं, गायन स्पर्धा यांत सहभाग घेण्यापासून मला कधीही रोखलं गेलं नसल्याचे त्याने सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

स्ट्रगलच्या कालावधीत प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिका आणि त्यातून तुम्ही स्वतःमध्ये काही ना काही बदल करून घ्या. सातत्याने प्रयत्न करत राहा, हताश होऊ नका आणि यशापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. कारण मी स्वतःही मुंबईत आलो तेव्हा काम मिळेल की नाही,कुठे राहायचं असे अनेक प्रश्न माझ्यापुढे होते. मात्र कठीण काळात मित्रांनी साथ दिली. त्यांनी सुरूवातीला दिलेल्या प्रोत्साहन आणि मदतीमुळे स्ट्रगलचा आनंद घेत इथवर मजल मारली आहे.

पूर्वी संधी खूप कमी होत्या. आधीच्या काळात आणि आताचा काळ बराच बदलला आहे. पूर्वी ४ ते ५ आघाडीचे कलाकार असायचे. मात्र आता काळ बदलला आहे. आघाडीच्या १० ते १५ कलाकारांची फौज आहे. बरेच नवे लेखक, दिग्दर्शक आहेत. नवनवीन विषय त्यांचे तयार असतात. तुलनेनं माध्यमांची संख्याही वाढल्याने प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. तुम्ही कोणतंही प्रोफेशन निवडू शकतात. पालकांचा त्यामुळे विश्वास वाढला आहे. त्यांनाही मुलांच्या भवितव्याची चिंता वाटत नाही. कारण तुमच्यात टँलेंट आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता.

मी ज्यावेळी या चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, त्यावेळी मला काहीतरी हटके करायचं होतं. वेगळं काही तरी रसिकांनाही पसंत पडेल. लोकांनाही वाटलं पाहिजे काहीतरी नवं पाहायला मिळणार आहे. हटके पाहायला मिळेल असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. रसिकांच्या पसंतीची पावती, त्यांचा विश्वास आणि प्रेम हेच माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे.

सोबतच भारतातच नाही तर देशाबाहेर परदेशातही तुमच्या कामाला पसंती मिळते त्याचा आनंद वेगळा असतो. कलेला कोणतीही बंधनं नसतात. देशाच्या सीमा, भाषा, संस्कृती सारं काही पार करून जेव्हा तुम्ही केलेलं काम रसिकांना भावतं तेव्हा काम करण्याची नवी उमेद मिळते. आमच्या स्टार मराठीच्या टीमतर्फे आयुष्मान ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!