मित्रांनो!, अतिशय रंजक आणि उत्कंठावर्धक असणाऱ्या देवमाणूस या मालिकेचा शेवटचा एपिसोड १४ किंवा १५ ऑगस्ट रोजी रसिकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या जागी ‘ती परत आलीये’ ही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला दाखल होणार आहे. ‘देवमाणूस’ मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. मालिकेचा शेवटचा भाग लवकरच रंगणार आहे. त्यानंतर नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.
त्यामुळे अवघे काहीच दिवस मालिका रसिकांचे मनोरंजन करणार आहे. मालिका रसिकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. मालिकेतील कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय रसिकांना भावला. मालिकेमुळे कलाकारांनाही वेगळी लोकप्रियता मिळाली. त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. या मालिकेत प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन देण्यात आलंय.
डिंपलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता देशमुखला एका एपिसोडसाठी १७ हजार रुपये मिळतात.
बज्याची भूमिकेसाठी अभिनेता किरण डांगे याला एका एपिसोड साठी ११ हजार रुपये मिळतात.
टोण्याची भूमिकेसाठी बालकलाकार विरळ माने याला एका एपिसोडसाठी १० हजार रुपये मिळतात.
चंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधुरी पवार हीला एका एपिसोडसाठी १४ हजार रुपये मिळतात.
सरू आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुक्मिणी सुतार यांना एका एपिसोडसाठी १५ हजार रुपये इतके मानधन मिळते.
दिव्या सिंगची भूमिका साकाण्यासाठी नेहा खानला १८ हजार रुपये मिळतात. आर्याचं पात्र साकारणारी सोनाली पाटील हीला एका एपिसोडसाठी १६ हजार रुपये मिळतात. तर या मालिकेतील सर्वात महत्वाचे पात्र डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याला एका एपिसोडसाठी २० हजार रुपये मिळतात.
या मालिकेच्या जागी ‘ती परत आलीये’ ही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला दाखल होणार आहे. या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या छोट्या पडद्यावर झळकू लागले आहेत. प्रोमोवरुन या मालिकचे कथानक रहस्यमयी किंवा हॉरर स्वरुपाचे असेल असंच दिसतंय.मालिकेत विजय कदम यांची मुख्य भूमिका आहे.
विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते त्यामुळे सावध राहा अशी चेतावनी देताना दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे? या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.