मित्रांनो!, वादळी पावसाने अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठं नुकसान झालं. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूराने कहर केला आहे. सरकारी नेते दौरे करताहेत, आश्वासने देताहेत, विरोधक सुद्धा दौरे करताहेत. एकंदरीत पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर राजकारण जोरात सुरू आहे.
सर्वसामान्य जनता मात्र मा. पंतप्रधानांचे “आत्मनिर्भर बनो” या आवाहनाला शब्दशः प्रतिसाद देत 2019 पासून पुराच्या बाबतीत एकमेकांना जमेल तशी मदत करतच आहे. कधी कधी सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो. आमचे प्रश्न आम्हालाच सोडवायचेत तर मग सरकार कशाला आहे?असो…
मराठी चित्रपट सृष्टीतील दीपाली सय्यद, भरत जाधव व इतर कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून आता सोनू सूद सुद्धा मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अतिवृष्टीने महाराष्ट्रातील काही भागात अक्षरशः थैमान घातले यामुळेच अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठं नुकसान झालं.
सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूराने कहर केला आहे. सोनू सूदने आता पूरग्रस्त भागातील गावक-यांना मदतीचा हात दिला आहे. अनेक गावात मूलभूत गरजा मिळत नाहीत त्यांना मदत करत आहे. सोनू चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात मदत पॅकेज पाठवणार आहे.
त्याबद्दल बोलताना सोनू सूद म्हणतो, “ही गावे पुरामुळे खूपच प्रभावित झाली आहेत आणि ती सर्व प्रमुख महामार्गांपासून 20-30 किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे तेथे मदत साहित्य पोहोचलेले नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी आधीच बोललो आहोत. मूलभूत गरजा जसे भांडी, कपडे आणि अगदी खाद्यपदार्थ सर्व पाठवले जात आहेत. कुटुंबांना वैयक्तिकरित्या वितरित करण्यासाठी माझी टीम स्वतः तिथे उपस्थित असणार आहे.
अन्नधान्याचे काही ट्रक उद्या येतील आणि आणखी काही एक दिवसानंतर येतील. महामार्गालगत बरीच मदत सामग्री आधीच पोहचली आहे, परंतु आतील गावांना अजूनही आवश्यक गोष्टी मिळत नाहीत. सोनू आणि त्याची टीम या आतील गावांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशी आणि इतर अनेक गावांना मदत साहित्य मिळणार आहे. हे मदत साहित्य संपूर्ण प्रदेशातील 1000 हून अधिक घरांना पुरवले जाईल आणि मदत साहित्याचा दुसरा ट्रक 4 दिवसात गावांमध्ये पोहोचेल.
या गावकऱ्यांना पुरेसे मदत साहित्य वितरित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून ते एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहू शकतील. सूद चॅरिटी फाऊंडेशनची टीम प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या गरजू लोकांची मदत करण्यासाठी आपणही प्रयत्न करू या.कोरोनाकाळापासून सुरु झालेले सोनू सूदचे मदत कार्य आजपर्यंत अविरत सुरु आहे.