मित्रांनो!, आजवर आम्ही कायमच तुम्हाला बॉलीवूड मधील अनेक नावाजलेल्या अभिनेत्री आणि आपल्या देशातील अनेक नामवंत सेलिब्रिटीज यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटनांची माहिती देत असतो. बऱ्याचदा अमुक तमुक यांच्या घरी झाले नवीन पाहुण्यांचे आगमन, अमुक बनले आजोबा, तमुक बनले आईबाबा इ. परंतु आम्हाला हा प्रश्न पडला की, या सर्व लोकांचे कुणी खास डॉक्टर्स आहेत का? जसे तुमचे आमचे फॅमिली डॉक्टर असतात तसेच यांचे पण असतीलच की!,
मग आम्ही काय केले? तर थोडासा रिसर्च केला. आणि आम्हाला एक विलक्षण गोष्ट आढळली. ती म्हणजे या बहुतेक सेलिब्रिटीज चे बाळंतपण हे एकाच डॉक्टरांच्या हस्ते झालेले आहे. ते ही अगदी गेली अनेक दशकांपासून… तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले हे डॉक्टर आहेत चक्क ९१ वर्षांचे. जाणून घेऊ या त्यांच्याविषयी.
ते आहेत डॉक्टर रूस्तम सोनावाला. डॉ. सोनावाला यांचे वैद्यकीय क्षेत्रात खुप मोठे नाव आहे. यांचे वय तब्बल ९१ वर्ष आहे. भारत सरकारने १९९१ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. १९४८ साली रूस्तम सोनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. सोनावाला यांनी इंट्रा गर्भाशय निरोधक यंत्राचा शोध लावला आहे. लेखिका रश्मी उद्यसिंह यांनी डॉ रूस्तम सोनावाला यांच्या आत्मचरित्रावर लाईफ गिव्हर हे पुस्तक लिहले आहे.
२० डिसेंबर २०१६ रोजी अभिनेत्री करिना कपुरने याच ब्रीच कँडी रूग्णालयात तैमुर ला जन्म दिला होता. करीनाची दुसरी डिलीव्हरी सोनावाला यांनीच केली. विशेष म्हणजे करिना कपुर यांची आई बबिता यांची डिलीव्हरी याच रूस्तम सोनावाला यांनी केली होती. त्याचबरोबर गौरी खान, जया बच्चन यांचीही डिलीव्हरी यांनीच केली आहे.
बॉलिवुडची अभिनेत्री आणि क्रिकेट मधील स्टार खेळाडु विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा हीने ११ जानेवारीला मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मुलीला जन्म दिला. अनुष्का गरोदर आसताना ब्रीच कँडी रूग्णालयातील प्रसिध्द डॉक्टर रूस्तम सोनावाला यांच्याकडे उपचार घेत होती. यांनीच तिची डिलीव्हरी केली आहे. हे डॉ. सोनावाला म्हणजेच डॉ. रुस्तम फिरोज सोनावाला. आता वयाची नव्वदी पार करूनही सक्रिय असलेले सोनावाला यांनी आपली प्रॅक्टिस 1948 साली सुरू केली.
सोनावाला आपल्या आत्मचरित्रात लिहितात, की तेव्हा डॉक्टर रुग्णांची नाडी पाहून उपचार करायचे. डायग्नोस्टिक प्रक्रिया आणि रक्तगटासारख्या गोष्टी नंतर आल्या.’ इतकंच नाही, तर सोनावाला यांनी इंट्रा गर्भाशय गर्भनिरोधक या यंत्राचा शोध लावला. त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. रश्मी उदयसिंह यांनी डॉ. सोनावाला यांच्यावर एक पुस्तक लिहिलं असून त्याचं नाव ‘लाईफ गिव्हर’ आहे