बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर ही प्राण्यांवर किती प्रेम करते हे सर्वांनाचं माहिती आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर प्राण्यांच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात. ती बहुतांश मोकळा वेळ आपल्या पाळीव प्राण्यांसोबत घालवत असते. इतकचं नव्हे तर आपल्या या लाडक्या पाळीव प्राण्यांचा ती वाढदिवससुद्धा साजरा करते.

त्यामुळे श्रद्धाचं सगळेच कौतुक करत असतात. श्रद्धाने पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत, आपलं प्राणीप्रेम व्यक्त केलं आहे. पाहूया काय आहे, ही नेमकी पोस्ट.

श्रद्धाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ती २ वर्षांपासून शाकाहारी झाली तर त्याचा तिचा अनुभव कसा होता हे सांगितलं आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रद्धाने ती काय खाते ते सांगितले आहे. त्या सगळ्यामुळे ती कशी फीट झाली आणि आनंदात राहते हे तिने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

गेल्या दोन वर्षांपासून मासं, मच्छी आणि मटनचे सेवन केले नाही असे तिने सांगतिले आहे. आपल्या जेवनासाठी कोणचा जिव घेऊ नका. या कारणामुळे ती शाकाहारी झाली आहे. हा व्हिडीओ शेअर करत “आपण सर्वजण जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करत असताना, मला हे सांगायचं होतं की मी २१ जुलै २०२१ रोजी शाकाहारी होण्यास दोन वर्ष पूर्ण केली. मी प्राण्यांवर असलेले माझे प्रेम पाहता शाकाहारी होण्याचे ठरवले.

यामुळे मी फीट आणि आनंदी झाले,” अशा आशयाचे कॅप्शन श्रद्धाने दिले आहे. श्रद्धाचे लाखो चाहते आहेत. इतकचं नव्हे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या सर्व चाहत्यांना शाकाहारी आहार घेण्याचं आवाहन केलं आहे. श्रद्धाच्या या मोठ्या मनाचं सध्या सर्वत्र कौतुक होतं आहे. श्रद्धा बॉलिवूडची एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. मात्र यापलीकडे ती एक उत्कृष्ट माणूससुद्धा आहे.

तिचा हळवं मन अनेक गोष्टींमधून दिसून येतं. त्यामुळेचं श्रद्धा सर्वांची लाडकी अभिनेत्री समजली जाते. श्रद्धाच्या पोस्टवर फक्त चाहतेचं नव्हे तर अनेक कलाकारसुद्धा कमेंट्स करून तिचं कौतुक करत आहेत. भूमी पेडणेकर, सिद्धांत कपूर, जेकलीन फर्नांनडीस या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.

आपल्या माणूसकीने श्रद्धाने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलं आहे. श्रद्धा कपूर टायगर श्रॉफसोबत ‘बागी ३’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच तिचे ‘नागिन’ आणि ‘स्त्री २’ या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर ‘स्त्री’मध्ये श्रद्धा राजकूमार रावसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.