मित्रांनो!, आज आपण बोलणार आहोत एका क्युट लहानग्या स्टारकीड बद्दल, परंतु तत्पूर्वी काही माहिती त्याच्या सुपरमॉम बद्दल… बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया ही तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत बरीच चर्चेत राहिली. त्यावेळी तिने चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले. लोकांनी तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. पण जर आपण तिच्या त्यापुढील चित्रपट प्रवासाबद्दल बोललो तर ती त्यात मागेच राहिली.

आयेशा टाकिया सध्या चित्रपट व प्रसिद्धीपासून दूर आपल्या कुटुंबासह आनंदी जीवन जगत आहे. दरम्यान, आयेशा टाकिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज आम्ही तुम्हाला आयेशा टाकियाचा गोंडस मुलगा मिखाईल बद्दल सांगणार आहोत. जो क्यूटनेस व सुंदरतेच्या बाबतीत तैमूर अली खानलाही टक्कर देतोय.

आयेशा अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलगा मिखाईलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. मिखाईलचा जन्म 2013 मध्ये झाला होता. लग्नानंतर जेव्हा आयेशाने घर गृहस्थी सांभाळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिने चित्रपट व प्रसिद्धीपासून कायमच अंतर ठेवले. त्यानंतर आयेशा कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आयेशाने आपले सर्व काम सोडून दिले आणि मुलगा मिखाईलला जास्त वेळ दिला.

आणि सध्या ती आपल्या कुटुंबासह खूप आनंदी जीवन जगत आहे. आयेशा ही तिचा मुलगा मिखाईलच्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये आणि व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत खेळताना आणि मजा करताना दिसत असते. आयेशाचा मुलगा मिखाईल क्यूटनेसच्या बाबतीत तैमूर अली खानलाही मागे टाकेल असा आहे. मिखाईलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यांना चाहत्यांनी खूप पसंती व प्रसिद्धी दिली आहे.

आपणांस हे माहित आहेच की आयेशा टाकियाने 2009 मध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीसोबत लग्न केले. तो एक मोठा हॉटेल व्यावसायिक व बिझनेसमन आहे. लग्नानंतर आयेशा चित्रपटांपासून दूर राहिली. ती शेवटी ‘वॉन्टेड’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात आयेशा बॉलिवूड दबंग सलमान खानसोबत झळकली होती.

या चित्रपटातील दोघांच्या लव्ह केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. अलीकडेच आयेशा टाकिया तिच्या बदललेल्या लूकमुळे बरीच चर्चेत आली होती. आयेशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तिचे ओठ खूप मोठे दिसत होते. खरेतर, आयेशाने तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया केली होती, ज्यामुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली.

पण ट्रोल्सकडे दुर्लक्ष करून ही बिनधास्त अभिनेत्री आपले आयुष्य आपल्या मर्जीनुसार जगणे पसंत करते. आयेशाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटाने केली होती. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आयेशा व्यतिरिक्त अभिनेता अजय देवगण आणि वत्सल सेठ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते.