बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासूनच काही खास कुटुंबांचा, खानदानांचा किंवा घराण्यांचाच वरचष्मा, दबदबा कायम राहिलेला आहे. किंबहुना आजही राजकारणासारखी इथेसुद्धा बऱ्यापैकी घराणेशाही चालतांना दिसते. याच हिरो हिरोइन्सची मुले, पती, पत्नी, भाऊ बहिणी, सुना, जावई अगदी काहींची तर नातवंडे व प्रसंगी नातेवाईक सुद्धा पैसा, प्रसिद्धी आणि सत्तेच्या जोरावर चित्रपट रसिकांवर अक्षरशः लादली जात आहेत. असो…

आजचा तो विषय नाही. तर मित्रांनो!, आजचा विषय आहे, तो म्हणजे बॉलिवूड मधील काही सुप्रसिद्ध खान मंडळींनी मुलींशी केलेले आंतरधर्मीय विवाह. तर काहींचे झालेले घटस्फोट. आताच्या आधुनिक काळात केवळ चित्रपट दुनियेतच नाही, तर सामान्य लोकांमध्येही आता आंतरधर्मीय विवाह ही एक सर्वसामान्य बाब बनली आहे.

लोकांनी धर्माची बंधने झुगारून आपापले जीवनसाथी निवडले आहेत. आपल्या स्वतःच्या कर्तृत्ववाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या काही निवडक खान मंडळींनी आंतरधर्मीय विवाह करून बायका केल्या आहेत. चला तर मग या खानावळीची माहिती जाणून घेऊयात.


शाहरुख खान : बॉलीवूड सिनेसृष्टीतील बादशहा, सर्वात प्रसिद्ध किंग उर्फ शाहरुख खान याने गौरी छिब्बर हिच्याशी लग्न केले असून गौरी ही एका पंजाबी कुटुंबातील मुलगी आहे.

आमिर खान : बॉलीवूड इंडस्ट्रीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने वयाच्या २१ व्या वर्षीच बंगाली कुटुंबातील रीना दत्त हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर रिनाला घटस्फोट देऊन आमिरने किरण राव ह्या दुसऱ्या हिंदू तरुणीशी विवाह केला. आता तिलाही घटस्फोट दिलाय.

सैफ अली खान : पतौडीचा नवाब सैफ अली खानने देखील अमृता सिह नावाच्या एका पंजाबी कुटुंबातील मुलीशी विवाह केला होता. तिला सोडल्यानंतर सैफने दुसऱ्या वेळी देखील पंजाबी कुटुंबातीलच बायको शोधली, त्याने कपूर परिवारातील करीना कपूरशी लग्न केलेय.

इरफान खान : दिवंगत अभिनेता इरफान खान याने आपली हिंदू मैत्रीण सूतापा सिकंदर हिच्याशी लग्न केले.
इम्रान खान : आमिर खानाचा भाचा इम्रान खान यानेही आपली दीर्घकाळापासूनची मैत्रीण अवंतिका मलिक हिच्याशीच लग्न केले.
सलीम खान : सलमान खानचे वडील सलीम खान यांनीही सुशीला चरक नावाच्या हिंदू मुलीशी लग्न केले, पुढे तिने धर्मपरिवर्तन करुन आपले नाव सलमा केले.

अरबाज खान : सलीम खान यांचा मुलगा व सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने मलायका आरोडा हिच्याशी लग्नं केले होते. आता ते विभक्त राहतात.
सोहेल खान : सलीम खान यांचा दुसरा मुलगा व सलमानचा भाऊ सोहेल खान यानेही सीमा सचदेव हिच्याशी लग्न केले.

Fardeen Khan with wife Natasha at ‘The Charcoal Project’

फरदीन खान : दिवंगत फिरोज खानचा मुलगा फरदीन खान याने देखील सिंधी कुटुंबातील नताशा माधवानी हिच्याशी लग्न केले आहे.
कबीर खान : फिल्म निर्माता निर्देशक कबीर खानने प्रसिद्ध अभिनेत्री मिनी माथूरशी लग्न केले.
झायेद खान : अभिनेता जायद खानने मलाईका पारेख हिच्याशी लग्न केले