मित्रांनो!, नुकताच जागतिक योग दिवस जगभरात विविध योगा आणि त्याच्याशी संबंधित ऍक्टिव्हिटीज करून साजरा केला गेला. योग आणि आयुर्वेद ही आपल्या भारत देशाकडून संपूर्ण जगाला देण्यात आलेली एक अनमोल देणगी आहे. हे सर्व आठविण्याचे आणखी एक कारण म्हणजे, एकेकाळी टेलिव्हिजन विश्वात TV Industry सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आणि मा. केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी Smriti Irani या सोशल मीडियावर सध्या चर्चेमध्ये आहेत.

त्या सध्या चर्चेमध्ये असण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा नवा स्लिम अँड ट्रिम लूक. स्मृती इराणी यांचा नवा लूक New Look पाहून तुम्ही त्यांना ओळखू सुद्धा शकणार नाहीत. स्मृती इराणी यांनी जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेंशन Smriti Irani Body Transformation केले आहे. त्यांच्यामध्ये झालेला हा सकारात्मक बदल पाहून सर्वांना धक्का बसला आहे. नियमित योगा Yoga आणि एक्सरसाइज Exercise करुन त्यांनी आपलं खूप वजन कमी केलं आहे.

स्मृती इराणी सोशल मीडियावर Social Media खूप सक्रीय असतात. त्या सोशल मीडियावर नेहमी आपले फोटोज Photos पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी नव्या स्लिम ट्रिम लूकचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर Instagram Account पोस्ट केला. हा फोटो पाहून सर्वांना धक्काच बसला.

स्मृती इराणी या खूपच बारीक झाल्या आहेत. त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. टीव्ही क्वीन एकता कपूरने Television Queen Ekata Kapoor स्मृती इराणी यांच्या फोटोवर कमेंट्स करत चक्क ‘thinnnnnn’ असं लिहिलं आहे. म्हणजे स्मृती इराणींनी इतके हे Body Transformation यशस्वीपणे केलेले आहे.

स्मृती इराणी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच या फोटोंवर भरभरुन कमेंट्स करत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नव्या लूकचे कौतुक केलं आहे. अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलने Manish Paul स्मृती इराणी यांचा फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘आता सर्व लोकं चहाच्या जागी काढा पिऊ लागतील’

स्मृती इराणीने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील स्मृती इराणी यांची भूमिका खूप गाजली होती. ही मालिका त्यावेळी इतकी सुपरडुपर हिट Superhit ठरली होती की प्रेक्षक आपली कामं विसरून ती मालिकाच पाहात बसायचे. या मालिकेचं टायटल सॉन्ग ‘क्योंकी सास भी…’ हे सुद्धा त्यावेळी खूपच लोकप्रिय झाले होते.