मित्रांनो!, बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता हिने नुकतेच तिचे ‘सच कहूं तो’ आत्मचरित्र प्रकाशित केले. या पुस्तकात नीनाच्या आयुष्याशी आणि कारकीर्दीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी आहेत. या पुस्तकात, क्रिकेटपटूच्या नात्यात असताना गर्भवती झाल्यावर नीनाने तिच्या आयुष्याच्या टप्प्याचा उल्लेखही केला आहे.
१९८० च्या दशकात, निना गुप्ता विव्ह रिचर्ड्सबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. रिचर्ड्स हा वेस्ट इंडीज संघाचा क्रिकेट संघाचा कॅप्टन असून जगातील महान फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. प्रेग्नन्सीच्या त्या कठीण परिस्थितीतसुदधा चरित्र अभिनेता सतीश कौशिक नीनाशी लग्न करून तिच्या होणाऱ्या अपत्याला दत्तक घेण्यास तयार झाला होता.
तरीही नीनाने एकटीनेच आपली मुलगी मसाबाचे पालनपोषण केले. आजच्या घडीला मसाबा गुप्ता चित्रपटसृष्टीच्या उत्कृष्ट फॅशन डिझायनर्सपैकी एक मानली जाते. जेव्हा निना गर्भवती होती, तेव्हा सतीश कौशिक तिच्याशी बोलत असताना म्हणाला होता की,”तु काळजी करू नको. जरी तुझे मूल काळे जन्मले तरी तु म्हण की ते मूल सतिशचेच आहे. आपण लग्नं करू आणि नंतर मग कोणालाही काही कळणार नाही”
नीना गुप्ता आणि सतीश कौशिक हे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा उर्फ एनएसडीचे बॅचमेट होते. १९८० च्या दशकात या दोघांनी छोट्या बजेटमध्ये बनवलेल्या पॅरलल सिनेमामध्ये काम केले. सतीश आणि नीना यांनी तीन चित्रपटात एकत्र काम केले. ‘जाने भी दो यारों’, ‘मंडी’ आणि ‘उत्सव’ असे हे चित्रपट होते. चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. शेखर कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ मध्ये सतीशने ‘कॅलेंडर’ नावाची व्यक्तिरेखा साकारली, ज्यामुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली होती.
असो… तर आपण नीना गुप्ताबद्दल बोलत होतो. निना म्हणाली की गर्भधारणेचा परिणाम तिच्या कामावर होऊ लागला आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नीना सांगते की त्या काळात तिची प्रतिमा एक मजबूत आणि धाडसी स्त्रीची झाली होती. पण आपल्याकडे चित्रपटांमध्ये, धैर्यवान आणि बळकट स्त्रिया नकारात्मक मार्गाने दाखविल्या जातात.
म्हणूनच निनाला चित्रपटांमधील वर्चस्व गाजविणाऱ्या खलनायिका चरित्रांच्या भूमिकांच्या ऑफर मिळू लागल्या. नीनाला मात्र सामान्य स्त्री पात्रच साकारण्याची इच्छा होती. २००८ मध्ये जेव्हा मसाबा १ वर्षांची होती तेव्हा नीनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने दिल्लीमध्ये राहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहराशी लग्न केले.
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात नीना जवळपास चित्रपटांपासून दूर होती. तसे तिने काही चित्रपटांमध्ये काम केले पण त्या भूमिका कोणाच्या लक्षातही आल्या नव्हत्या. परंतु वर्ष २०१८ मध्ये तिचे स्टार पुन्हा एकदा चमकले. या वर्षी ती ‘वीर दी वेडिंग’, ‘मुल्क’ आणि ‘बधाई हो’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.
‘बधाई हो’ च्या यशाने नीना गुप्ता पुन्हा स्टार झाली. तेव्हापासून आपण सतत तिला चांगल्या भूमिकांमध्ये पाहत आहोत. अलीकडेच नीना ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ आणि ‘सरदार का ग्रँडसन’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.