हिंदी सिनेसृष्टीत आजवर अनेक अभिनेत्र्या आल्या आणि त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची जोरावर हिंदी सिनेसृष्टीवर आपलं अधिराज्य गाजवलं. काहींना तर त्यांच्या अभिनयासोबतच निसर्गत:च अगदी मोहक स्वरूपाच सौंदर्य लाभलेलं पहायला मिळतं. परंतु हिंदी सिनेसृष्टीत अर्थात या बॉलीवुडमधे अशाही काही अभिनेत्री आहेत, ज्यांना सौंदर्याच्या बाबतीत मोहकतेची अफाट देणं असूनदेखील त्यांना बॉलिवुडमधे फारस यश संपादन करता आलेलं नाही. चला तर माग आज आपण जाऊन घेऊयात कोण आहेत नेमक्या या अभिनेत्र्या? तर पहिलं नाव जे आपल्यासमोर सांगायचं म्हटलं तर ते आहे, नेहा शर्मा या अभिनेत्रीचं. नेहा शर्मा आजच्या घडीला बॉलिवुडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. नेहाचं बॉलीवुडमधे पदार्पण इमरान हाश्मी या अभिनेत्यासोबत क्रुक या सिनेमातून झालं होतं. त्यानंतर तिला “तुम बिन 2”, “जयंताभाई की लव्हस्टोरी”, “क्या सुपरकुल है हम”, यांसारख्या चित्रपटांमधून काम करण्याची संधी मिळाली. परंतु यानंतर तिला हवे तसे सिनेमेच मिळाले नाहीत, जणू तिची जादू अचानक ओसरावी असचं काहीस घडलं. नेहा एका राजकारणी घराण्यातून आलेली अभिनेत्री आहे. आज नेहा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक गोष्टी तिच्या चाहत्यावर्गासोबत शेअर करत असल्याची पहायला मिळते.
यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे, यामी गौतम. यामी गौतम तिच्या फेअर ॲण्ड लव्हली या क्रिमच्या जाहिरातीने सुरूवातीला प्रचंड गाजली. त्यानंतर तिला हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी सिनेमेदेखील भेटले. काही दर्जेदार सिनेमे जसं की बाला, उरी – द सर्जिकल स्ट्राईक, विक्की डोनर, काबिल देऊनही आजपर्यंत तीच नाव टॉपच्या अभिनेत्रींमधे सामिल झालेलं नाही. यामी निर्विवादपणे तिच्या भुमिका योग्यपणे निभावते आहे. पण तरीदेखील तिच नाव आज तेवढ्या प्रमाणात टॉपच्या अभिनेत्रींमधे गणलं जात नाही, ही बाब थोडी आश्चर्याचीच आहे.
पुढे ज्या अभिनेत्रीचं नाव येतं, त्या अभिनेत्रीने तर दाक्षिणात्य सिनेमेही गाजवले आहेत. आणि असं असतानादेखील तिला आजवर स्वत:ची वेगळी खास अशी ठळक ओळख म्हणावी तितक्या प्रभावीपणे निर्माण करता नाही आली. तर ही अभिनेत्री म्हणजे इलियाना डिक्रुज. अजय देवगण, अक्षय कुमार, यांसारख्या अभिनेत्यांसोबत तिने आजवर काम केल्याच पहायला मिळालं आहे. इलियानाच्या सौंदर्याला अगदी तोड नाही असं म्हटलं तरी चालेल. ती हिंदी सिनेसृष्टीत तिच्या सौंदर्यांच्या आणि अभिनयाच्या जोरावर अनेकांची मन जिंकून घेते. परंतु असं असलं तरीदेखील ती आज टॉपच्या अभिनेत्रींमधे सामिल होतं नाही, हे जरा विषेशच आहे असं म्हणावं लागेल.
यानंतर जिचं नाव पुढे येतं ती म्हणजे, एलविन शर्मा. “ये जवानी है दिवानी”, “यारियां”, “मै तेरा हिरो”, यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या कामाची छाप उमटवलेली एलविन आज बऱ्याचदा विना सिनेमांची रखडलेली पहायला मिळते. तिचं सौंदर्य अप्रतिम असलं तरीही तिला एक प्रमुख अभिनेत्रीच्या भुमिकेत आजवर पहायला नाही मिळालं आहे. ती अजुनही सहाय्यक भुमिकांमधेच असल्याची दिसून येते.
आता पुढे ज्या अभिनेत्रीचं नाव येतं ती म्हणजे, प्राची देसाई. प्राचीने एक काळ अगदी असा काही गाजवला असल्याचं पहायला मिळतं, जिथे हिंदी सिनेसृष्टीत तिच्याच नावाची जणू सगळीकडे चर्चा रंगली होती. बोल बच्चन, वन्स अपोन अ टाईम इन मुंबई, अजहर, पुलिसगिरी यांसारख्या सिनेमांमधून तिने तिच्या अभिनयाची चांगलीच झलक तमाम रसिकप्रेक्षकांना दाखवली. तिचा प्रवास हा टिव्ही मालिकांमधून सुरू झाला होता. परंतु आज जणू ती अगदीच पडद्याआड झाली आहे. एक उत्कृष्ट कलाकार आणि मोहक, गोंडस चेहऱ्याची ही अभिनेत्री आज सिनेसृष्टीत पहायला मिळतं नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!