“पाहिले न मी तुला” ही झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली मालिका सध्या रसिकप्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पसंतीस उतरत चालल्याचं पहायला मिळतं आहे. या मालिकेत शशांक केतकर हा अभिनेता तर त्याच्या अभिनयातून इतरांची मने जिंकतोच आहे पण त्याखेरीज या मालिकेत प्रमुख भुमिकेत असलेली” मनू” देखील रसिकप्रेक्षकांच्या मनावर चांगलच अधिराज्य गाजवताना पहायला मिळते आहे.

सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक मनोरंजनात्मक मराठी मालिकांच शुटिंग हे करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील राज्यांमधे हलवण्यात आलं आहे. त्यामुळे काही मालिका रिपीट मोडवर सुरू असून लवकरचं त्या पुर्वपदावर येणार असल्याचीही माहिती प्रत्येक वाहिनीवर मिळते आहे.

सध्या पाहिले न मी तुला या मालिकेतली मनू अर्थातचं खऱ्या आयुष्यातील “तन्वी मुंडले” हीचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. तन्वीने नुकताच तिचा एक ग्लॅम अंदाजातला फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे, आणि या फोटोला चाहत्यांमधून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे.

तिच्या या फोटोची चर्चा साहजिकचं सोशल मीडियावर रंगल्याची पहायला मिळते आहे. खरतरं तन्वीचा असा सोज्वळ चेहरा आणि त्यात तिचा ग्लॅम लुक दोन्हींच समीकरण अगदी जुळून आलयं असचं म्हणावं लागेल. पाहिले न मी तुला मालिकेतील हीच ती मनू का? असा प्रश्नही अनेकांना निर्माण झाल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. अर्थात तन्वीने तिच्या आजवरच्या सोशल मीडियावर असे फारसे फोटोज शेअर केले नसल्याने, अनेकांना ती मालिकेत जशी वावरते तितकीशीच ठाऊक आहे.

पाहिले न मी तुला मालिकेत आपल्या निरागस, साध्या, सरळ, सालस अभिनयाच्या जोरावर आज तन्वी अगदी कमी काळात रसिकप्रेक्षकांच्या मनातली उत्तम अभिनेत्री झालेली पहायला मिळते आहे. तिच्या ऑनस्क्रीन अदांनी तर ती नेहमी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतेच आहे त्याशिवाय तिच्या ऑफस्क्रीन वैयक्तिक आयुष्याबाबतही ती आता अनेकांच्या नजरेत आहे.

तिच्या सोशल मीडियावरील प्रोफाईलकडे पाहिलं तर तन्वी तिच्या अकाउंटवरून काय काय गोष्टी इतरांसोबत शेअर करत असते हे पहायला मिळते. तन्वीला अभिनयासोबतच नृत्याची प्रचंड आवड असल्याची दिसून येते. तन्वीला याआधी तमाम रसिकप्रेक्षकांनी विविध कामांमधून पाहिलं आहे. तन्वी अ रिस्पेक्टेबल वेडिंग, कुणाचा कुणाला मेळ नाही या नाटकांमधून प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या कामाची दखल तमाम सिनेसृष्टीने याचवेळी घेतली होती.

आता भविष्यातही ती लवकरचं, ललित प्रभाकर व सई ताम्हणकर यांच्या कलरफूल या सिनेमात झळकणार असल्याची खबर आहे. तन्वीचा हा तसा पहिलाच सिनेमा असणार आहे, त्यामुळे तिच्या या प्रोजेक्टकडे सर्वांची नजर असणार आहे. तन्वी पुण्यात लहानाची मोठी झाली, पुण्यातचं तिने फिजिक्स सारख्या विषयात बी.एस.स्सीची डिग्री पुर्ण केली. सध्याच्या घडीला तिच्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेचही शुट आता परराज्यात नुकतचं सुरू झालं आहे.

मनोरंजनाला कुठलाही ब्रेक लागू नये याची खबरदारी सध्या मराठी मालिका घेत आहेत. तन्वी कायमच तिच्या अभिनयाच्या जोरावर पुढे भविष्यात चांगली वाटचाल करेल हे निश्चितच पहायला मिळणार आहे. तन्वीच्या कलागुणांची सुरूवातचं नाटकांमधून झालेली असल्याने, तिच्याकडे असलेल्या अंगभूत कलागुणांची चांगलीच निर्मिती झाली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!