बॉलिवुड अभिनेत्र्या अनेकदा खुप साऱ्या गोष्टींमुळे प्रकाशझोतात येताना पहायला मिळत असतात. त्यांपैकी अनेकदा काही अभिनेत्रींनी खुप साऱ्या कस लावणाऱ्या भुमिका केल्या आहेत. एकप्रकारे चॅलेंजिंग भुमिका करणं म्हणजे कलाकारासाठी खुप मोठी जोखमेची जबाबदारी असते. अनेक रसिकप्रेक्षकांच्या मनावर काही अभिनेत्रींनी आपल्या आंधळ्या स्त्री पात्राच्या भुमिकांमधून चांगलीच छाप उमटवली आहे.
चला तर आज आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी चॅलेंजिंग भुमिका बजावल्या आहेत. सुरूवातीला आपण जाणून घेऊयात राणी मुखर्जीने बजावलेल्या आंधळ्या पात्राच्या भुमिकेबद्दल. राणीने ब्लॅक या सिनेमात अशी भुमिका साकारली होती. २००५ साली संजय लीला भन्साळी या नामांकित दिग्दर्शकाने ब्लॅक हा सिनेमा बनवला होता.
अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी या सिनेमात भुमिका साकारली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट गेला होता. या सिनेमाचं रसिकप्रेक्षकांकडून चांगलच कौतुक झालं होतं. राणी मुखर्जी या सिनेमात आंधळ्या व बहिऱ्या महिलेची भुमिका साकारताना पहायला मिळाली होती. या सिनेमातली अमिताभ व राणी मुखर्जी यांची केमिस्ट्री फारच दर्जेदार पहायला मिळाली होती.
यानंतर असणारी अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. यामी गौतम हिने काबिल या सिनेमात आंधळ्या व बहिऱ्या महिलेची भुमिका साकारली होती. २०१७ सालात आलेल्या काबील सिनेमात ऋतिक रोशन आणि यामी गौतम यांनी कपलच्या रोलमधे भुमिका साकारल्या होत्या. आंधळ्या असणाऱ्या या दोन्ही कपलची लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर चांगलीच पसंतीस उतरली होती.
यानंतर पुढे येते ती आंधळ्या पात्राची भुमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे दिपीका पादुकोन. दिपीकाने लफंगे परिंदे या सिनेमात अशी भुमिका साकारली होती. तिच्या अनेक हिट चित्रपटांमधील भुमिकांशिवाय या सिनेमातल्या खास भुमिकेची फारच तारीफ रसिकप्रेक्षकांकडून झालेली पहायला मिळते. नील नितिन मुकेश या अभिनेत्यासोबत दिपीका या सिनेमात दिसली होती. दिपिकाचे या सिनेमात ॲक्शन सिन्सदेखील दाखवण्यात आले होते, शिवाय आंधळ्या भुमिकेतली मुलगी असलेली दिपीका यात आपल्या सेंसेसचा योग्य वापर करत गाडी चालवतानाही पहायला मिळाली होती.
यापुढे येणारी अभिनेत्री म्हणालं तर ती अभिनेत्री म्हणजे काजोल. काजोलने फना या प्रेमकथेवर आधारित असलेल्या सिनेमात आंधळ्या मुलीची भुमिका साकारली होती. काजोलच्या या भुमिकेचं फार कौतुक झालेलं पहायला मिळालं होतं. आमिर खान याच्यासोबत काजोल लीड भुमिकेत पहायला मिळाली होती. फना हा सिनेमा गाण्यांमुळे तर गाजलाच होता शिवाय काजोलने या सिनेमातील भुमिकेने चांगलाच रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता.
यापुढे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल त्याच कारण म्हणजे, बॉलिवूडच्या धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितनेदेखील आंधळ्या महिलेच्या भुमिकेतील काम सिनेसृष्टीत केलेलं आहे. १९९२ सालात आलेला “संगीत” या सिनेमातून तिने ही भुमिका साकारली होती. एक अनाथ आणि दिसायला आंधळी असलेली भुमिका माधुरीने निभावली होती, यात एका कलाकाराच्या मदतीने ती मोठी गायिका बनते अशा स्वरूपाची या सिनेमाची गोष्ट आहे. अभिनेता जॉकी श्रॉफदेखील या सिनेमात होता. माधुरीच्या या भुमिकेला सर्वांनीच पसंत केलं होतं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!