आपण अनेकदा उल्लेख करून जातो, पहिलं इम्प्रेशन हे शेवटचं असतं. किंबहुना तुमचा एक नजारा एखाद्यावर चांगली छाप उमटवून जाऊ शकतो. अनेकदा तर हे तुमच्या हास्याच्या बाबतीतच खर ठरतं, असं म्हणावं लागेल. बॉलिवूड कलाकारांकडे संपत्ती, पैसा, प्रसिद्धी या सर्व गोष्टी असतातचं. याशिवाय बॉलिवुडमधील कलाकारांच्या हसण्याने ते रसिकप्रेक्षकांच्या मनात थेट घर करून जात असल्याच आपण पाहतो.

तर आज आपण अशा ११ सिनेकलाकारांच्या हास्याबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच हसणं लोकांच्या मनात कायम घर करून राहतं. सर्वात पहिले, दिपीका पादुकोन. दिपीका ही बॉलीवुड सिनेसृष्टीतली एक सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. दिपीका जेव्हा स्माईल करते तेव्हा तिच्या गालावर जी खळी पडते अर्थात तिच्या चेहर्‍यावर डिंपल उमटून येतात आणि त्यामुळे तिचा चेहरा अधिक खुलून दिसतो. दिपीका जेव्हा स्माईल करते तेव्हा ती साहजिकचं अधिक सुंदर दिसते.

यानंतर येतो बॉलीवुडमधील किंग खान अर्थात शाहरूख. शाहरूखची फॅन फाॅलोविंग जगभरात अफाट आहे. तो सर्व रसिकप्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवणारा अभिनेता राहिला आहे. स्त्रियांना अक्षरश: वेड लावून जाणारं शाहरूखचं हास्य आहे. शाहरुखच्या चेहर्‍यावर स्माईल देताना जे डिंपल पडतात, ते समोरच्या व्यक्तीला जणू मोहूनच टाकतात. शाहरुखच्या स्माईलवर जग फिदा असल्याची ग्वाही गुगलनेदेखील अनेकदा दिली आहे.

बॉलीवुडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितदेखील आपल्या स्माईलच्या बाबतीत फार काळजीपुर्वक गोष्टी करते. कारण तिची स्माईल नेहमीच तिच्या चाहत्यांना व रसिकप्रेक्षकांना एक वेगळाच आनंद देऊन जाते. माधुरीने तिच्या स्माईलला एक परफेक्ट स्माईल बनविण्यासाठी आधी बरीचशी मेहनत घेतली आहे. आश्चर्य वाटेल पण तिने एकूण एक बारकाव्यांवर काम करत आपल्या स्माईलला हटके बनवलं आहे. तिच्या स्माईलचे लोक अक्षरश: दिवाने आहेत.

यानंतर येते ती म्हणजे, प्रीती झिंटा. प्रीती झिंटा तिच्या अभिनयासाठी तर लक्षात राहतेच. पण त्याशिवाय खरं म्हणजे, प्रीती झिंटा तिच्या स्माईलमुळे कायम लक्षात राहते. तिच्या गोंडस चेहर्‍यावर पडणारी डिंपलवाली खळी मनाला मोहून टाकते. तुम्हाला माहित असेलचं सोल्जर सिनेमातली तिची पडद्यावरील पहिली झलकच सर्वांना दिवाना करून गेली होती.

ऐश्वर्या राय हिच्याबद्दल बोलायचं म्हटल्यावर, तिची खासियत असलेले निळे डोळे सर्वप्रथम आपल्या नजरेत येतात. परंतु त्या निळ्याशार डोळ्यांव्यतिरिक्त जे काही आपल्या नजरेसमोर येत ते तिच सौंदर्य. आणि या सौंदर्याला चार चांद लावणारी तिची स्माईल. ऐश्वर्याने तिच्या चेहर्‍यावर स्माईल देताना जे नकळतचे निरागस भाव निर्माण करते त्याने तिची स्माईल फारच भन्नाट बनून जाते. ऐश्वर्याने जगभरात आपल्या स्माईलने लोकांना दिवाना केल्याच पहायला मिळतं.

यानंतर येतो तो अभिनेता म्हणजे अगदीच डॅशिंग, गुड लुकिंग असलेला जॉन अब्राहम. जॉन खास त्याच्या परफेक्ट बॉडीमुळे प्रसिद्ध आहे. पण मुळात त्याची स्माईलदेखील अनेकांच्या ह्रदयावर राज्य करून जात असल्याची पहायला मिळाली आहे. जॉन त्याच्या निरागस हास्याने अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन जातो.

आलिया भट, हि सध्याच्या घडीतली प्रसिद्ध आणि तसेच ती एकप्रकारे पुढच्या जेनरेशनची अभिनेत्री आहे असं म्हणता येईल. आलिया जेव्हा जेव्हा स्माईल करताना पहायला मिळते तेव्हा तिच्यावरून नजर हटवणं सर्व रसिकप्रेक्षकांसाठी अवघड होऊन जातं. कारण तिची स्माईल सर्वांनाच वेड लावून जाणारी ठरते. विशेष करून तिच्या जवळचे व्यक्तीदेखील तिच्या स्माईलची अनेकदा तारीफ करताना पहायला मिळतात.

यापुढे ज्या सेलीब्रेटीची स्माईल अधिक मोहून जाते, ती सेलीब्रेटी व्यक्ती म्हणजे नेहा कक्कर. नेहा कक्कर हि एक गायिका आहे. तिच्या चाहत्यांना तिची स्माईल नेहमीच आवडली आहे. नेहा एकप्रकारे अगदी मनापासून स्माईल करते ज्यामुळे तिच्या चेहर्‍यावर त्या तेजाची भर पडते. आणि अशा प्रकारची तिची स्माईल लोकांना नक्कीच आवडते.

नव्वदीच्या दशकात आपल्या निरागस अभिनयाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या जुही चावलाचीदेखील स्माईल प्रचंड निखळ आणि तिच्या सौंदर्याला साजेशी अशी आहे. जी इतरांना पाहताक्षणीच आवडते. जुही चावला तिच्या आभिनयाच्या सुरूवातीच्या कारकिर्दीत अभिनयापेक्षा स्माईलच्या हावभावांमुळे अधिक ओळखली जाऊ लागली होती.

आता पुढे आहे ती अभिनेत्री म्हणजे, हेमा मालिनी. धर्मेंद्र हेमा मालिनीवर फिदा होण्याच एक मोठ कारण हेदेखील आहे की, हेमाच्या स्माईलवर पाहताक्षणी समोरचा घायाळ होऊन जाईल. हेमा मालिनी आजही तितक्याच दिलखुलासपणे आपलं सदाबहार हास्य जपून आहे.

यानंतर सध्याच्या घडीला हिंदी सिनेसृष्टीत एकदम टॉपला असलेला अभिनेता म्हणजे, आयुषमान खुराणा. आयुषमानच्या स्माईलने त्याचे चाहते त्याचे अधिकच दिवाने होऊन जातात. आयुषमान एकप्रकारे जबरदस्त छानशा स्माईलचा भविष्यात आयकॉन होऊ शकतो, असचं त्याने त्याच्या स्माईलवर प्रभुत्व मिळवलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!