"सारेगमप लिट्ल चॅम्प्स" मधल्या मुग्धाने खरेदी केली नवी कार, मुग्धाच्या या पोस्टवर झाला कौतुकाचा वर्षाव!

आजच्या घडीला मुग्धा वैशंपायन हिला कोणी ओळखत नसेल असं क्वचितच चित्र पहायला मिळेल. कारण एक काळ असा होता ज्यात या छोट्या वयाच्या मुलीने आपल्या आवाजाने तमाम महाराष्ट्राच्या रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्याचं पहायला मिळतं होतं. अर्थातचं सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या अंतीम 5 स्पर्धकांपैकी ती एक होती. या अंतीम 5 स्पर्धकांच्या टप्प्याला “पंचरत्न” हे नाव देण्यात आलं होतं.

कारण गाण्यातली ही पाच मौल्यवान रत्ने पुढे चालून या केवळ मराठी सिनेसृष्टीलाच नाही तर तमाम महाराष्ट्राला मिळणार होती. हे खऱ्या अर्थानं सार्थकीदेखील लागलं. एकीकडे रोहीत राऊत, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर आणि त्या पर्वात सर्वात लहान पण आवाजाने रूबाबदार असलेली मुग्धा वैशंपायन, यांनी आज आपला वेगळाच ठसा उमटविला असल्याचं दिसून येत आहे.

सध्या पाहिलं तर सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळत राहते. आणि शक्यतो कलाकारांच्या बाबतीत ही प्रसिद्धी मोलाचं वरदानही ठरते. सध्या काही दिवसांपूर्वीच सर्वांची लाडकी मुग्धा वैशंपायन ही “चला हवा येऊ द्या” या मराठी कार्यक्रमात येऊन गेली. तिने तिथे आल्यावर बऱ्याच गोष्टी मनमोकळ्या स्वभावाने शेअर केल्या.

मुग्धा वैशंपायन आज नव्या उभरत्या चांगल्या गायिकांपैकी एक आहे. तिचं युट्यूबवर चॅनेलदेखील आहे. ती तिच्या आयुष्यातल्या अनेक बातम्या आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रसिकप्रेक्षकांसोबत शेअर करत असल्याची पहायला मिळते. आणि अशाच प्रकारे तिने एक नवी बहार अशी खुशखबर सर्वांना एक पोस्ट शेअर करत दिली आहे.

मुग्धाच्या घरी आता एक नवा मेंबर आला आहे. या नव्या मेंबरची भरती करताना मुग्धाच्या आनंदाला अक्षरशः पारावर उरला नसल्याचं स्पष्टपणे पहायला मिळतं आहे. मुग्धाने नवी ह्युंडाईची कार खरेदी केली आहे. मुग्धाने नव्या कारचे फोटो कॅप्शनसहित पोस्ट केल्यानंतर अनेक सेलीब्रेटींनी त्यावर शुभेच्छांचा कमेंटमधून वर्षाव केल्याचं पहायला मिळतं आहे.

सुयश टिळक, अवधूत गुप्ते, कार्तिकी गायकवाड यांनी मुग्धाला शुभेच्छा दिल्या आहेत. रायगड जिल्हातून आलेल्या मुग्धाने लिट्ल चॅम्प्सच्या पर्वातून सर्वांना आपल्या गायनाने आश्चर्यचकीत करून सोडलं होतं. ती सध्या संगीत क्षेत्रातचं करियर करत आहे. मुग्धा शास्त्रीय संगीतात अगदीच तरबेज होताना दिवसेंदिवस पहायला मिळत आहे.

मुग्धाने काही दिवसांपूर्वी बेळगाव येथे एक चांगलाच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केल्याचा पहायला मिळाला. त्याला अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाददेखील लाभला होता. मुग्धाच्या बाबतीत काही खास गोष्टी सांगायच्या म्हटलं तर तिला साठी नेसण्याची विशेष आवड आहे. ती अनेक प्रसंगात तुम्हाला साडीमधेच असलेली पहायला मिळेल.

याशिवाय मुग्धाच्या काही खास आवडीदेखील आहेत, ज्यात तिला ट्रेकिंग, स्विमिंग, सोबतचं सायकलिंग करण्याचीसुद्धा प्रचंड प्रमाणात आवड आहे. मुग्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक बाबी नेहमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या खुप साऱ्या गोष्टीचे चाहते अगदी दिवाने होऊन जातात. सध्याच्या घडीला तसं पाहता मुग्धावर तरी तिच्या नव्या गाडीची धुन नक्कीच सवार आहे असं म्हणावं लागेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!