तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील एकुण एक पात्र तमाम भारतीयांना पसंतीस उतरलेलं पात्र आहे असं म्हणावं लागेल. आणि याच मालिकेतल्या एका महत्त्वाच्या पात्राची जिम्मेदारी सांभाळत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे तारक मेहता अर्थात शैलेश लोढा. आजवर तारक मेहता हे पात्र फारसं जेठालाल या पात्राच्या मदतीसाठी धावून जाणारं आणि जेठालालचं फायर ब्रिगेड या नावाने प्रसिद्ध झालेलं पहायला मिळतं.
याशिवाय मालिकेत तारक मेहता यांना एक लेखक दाखवलेलं आहे. खऱ्या आयुष्यात पाहायचं म्हटलं तर शैलेश लोढा एक अतिउत्कृष्ट कवी, लेखकांपैकी एक आहेत असं म्हटलं तर काहीच वावग ठरणार नाही. कारण शैलेश लोढा यांचे मालिकेतील पात्राशिवाय खऱ्याखुऱ्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात, ज्यामधे शैलेश लोढांना आवर्जून आपली कलाकारी सादर करावी लागते.
अनेकदा तर शैलेश लोढा यांचे खुप सारे लाईव्ह कार्यक्रमही होतं असतात. तुम्ही त्यांच्या कवितांना व लिखाणांना सोशल मीडियावर वाचूदेखील शकता. तर मुळात मुद्दा असा आहे की, या शैलेश लोढांच्या खाजगी आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या लोकांना सहसा क्वचितच माहित आहेत.
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही परंतु शैलेश लोढा यांच्या पत्नी या चक्क एक डॉक्टर आहेत. शैलेश लोढा यांच्या पत्नीचं नाव स्वाती तर मुलीचं नाव स्वरा आहे. आणि दोघीही दिसण्याच्या बाबतीत छान, सालस आणि सुंदर आहेत. आता एक डॉक्टर म्हटल्यावर स्वाती या त्यांच्या त्वचेची काळजी घेतचं असतील याबाबत काही दुमत नाही. शिवाय शैलेश लोढा यांची मुलगीदेखील सौंदर्याच्या बाबतीत अगदीच सोज्वळ व चार्मिंग असलेली पहायला मिळते.
खरतरं तसं पाहता शैलेश लोढा यांचा रसिकप्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी स्वाती यांचादेखील त्यांच्या जवळपासच्या लोकांमधे व इतरत्र लोकांमधे एक वेगळाच आदर, सद्भावना निर्माण झालेली पहायला मिळते. याला कारणही तसचं खास आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या स्वाती लोढा यांनी मुल व पालक यांच नातं कसं असावं? वा मुलं मोठी होतं असताना पालकांची काय जबाबदारी असते?
याचं खास महत्व सांगणार पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. शिवाय त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाचं अनावरण हे अमिताभ बच्चन यांच्या शुभहस्ते झाल्याचं पहायला मिळालं होतं. १९६९ सालात राजस्थान राज्यात जन्माला आलेले शैलेश लोढा आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर कॉलेजच्या जीवनापासूनच चर्चेत राहिले होते. १९९७ सालात सिनेसृष्टीत पदार्पण करत आजतागायत आपल्या कौशल्याने ते रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत.
अनेक मालिका व चित्रपटदेखील शैलेश लोढा यांनी केले आहेत. परंतु एक ठाम व वेगळीच ओळख त्यांना तारक मेहता या पात्राने करवून दिली. शैलेश लोढांच्या पत्नीबाबत तुम्हाला एव्हाना माहितचं पडलं आहे. स्वाती लोढा या सहसा प्रसारमाध्यमांपासून दुर राहणचं पसंत करतात. दुसरीकडे शैलेश व स्वाती यांची मुलगी स्वरा ही अजूनही तिचं शिक्षण पूर्ण करण्यात व्यस्त आहे.
स्वरादेखील आपल्या आईइतकीचं दिसायला देखणी व सुंदर आहे. स्वरा सध्यातरी अभिनय वा सिनेसृष्टी अशा गोष्टींपासून कोसो दुर असल्याची पहायला मिळते आहे. शैलेश लोढा यांच्या बाबतीत म्हणालं तर ते एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचं स्वरूप आहेत असचं शेवटी म्हणावं लागेल. त्यांच्या हस्ते चांगल्या कलाकृतींचे नेहमीच आपल्या रसिकप्रेक्षकांना दर्शन घडत राहो, हीच सदिच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!