हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक गोष्टींची त्या त्या बाबतीत काही विशेषता वठवल्या गेली आहे. अशाच प्रकारे सिनेमांकरता एकातरी आयटम साँगची निर्मिती केल्या जाते हे आपल्याला आता परिचयाचं झालेलं आहे. तर मुळात एकेकाळी आपल्या दमदार “कांटा लगा” या आयटम साँगमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला. शेफाली त्यानंतर फारशी चर्चेत अथवा फारशी प्रकाशझोतात पहायला मिळाली नव्हती.

परंतु मध्यंतरी तिने बिग बॉसच्या १३ व्या पर्वात हजेरी लावली आणि पुन्हा एकदा तिच्या नावाने सर्वत्र चर्चा रंगू लागली. शेफाली जरीवाला आपल्या अदाकारीतून अनेकांच्या ह्रदयाचा ठाव अगदी सहजरित्या घेऊ शकते यात काही वादच नाही. बिग बॉसच्या १३ व्या पर्वात ती चांगलाच परफॉर्मन्स देताना पडद्यावर झ’ळ’क’ली. तिने बिग बॉसच्या १३ व्या पर्वात अनेक अवघड टास्क अगदी सहजरित्या पुर्ण केल्याचेही पहायला मिळाले होते.

तिच्या कांटा लगा या गाण्याची प्रसिद्धी तर एका वेगळ्याच पातळीवर आहे असं म्हणावं लागेल. या गाण्याचे प्रचंड चाहते जगभरात आज पहायला मिळतात. आणि मुळात आता गोष्ट अशी आहे की, शेफाली जरीवाला ही अभिनेत्री पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. असं प्रसारमाध्यमांकडून सध्यातरी समजलं आहे की, तिला “खतरों के खिलाडी” या रिअॅलिटी कार्यक्रमासाठी बोलवण्यात येणार आहे.

खतरों के खिलाडीच्या आता 11 व्या पर्वाचा शुभारंभ लवकरच पहायला मिळेल. आणि या पर्वासाठी मेकर्सकडून तिला बोलावण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. ई-टाइम्स यांच्या वृत्तानुसार मेकर्स आणि शेफाली यांच्यात यावरून बोलणी सुरू आहे. एकदा शेफाली व मेकर्स यांची डिल पक्की झाली की शेफाली जरीवाला ही हमखास खतरों के खिलाडी च्या नव्या पर्वात पहायला मिळेल.

शेफाली जरीवाला तसं पाहता तिच्या एकूण कारकिर्दीत अधिक कामापेक्षा कमी कामातचं जास्त प्रमाणात प्रसिद्धीत राहिल्याची आजवर पाहिल्या गेली आहे. नुकतचं मिया सिंह यांच्या एका गाण्यातही ती पहायला मिळाली होती. शेफाली जरीवाला सध्याच्या घडीला तरी मालदीवमधे तिच्या नवऱ्यासोबत व्हॅकेशन मजेत घालवत असल्याची पहायला मिळते आहे.

ती तिथल्या बऱ्याच गोष्टींचे फोटोजही सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असल्याची पहायला मिळते. शेफालीचा नवरा पराग त्यागी हा आहे. पराग हादेखील एक अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. परागने आजवर सरकार 3, फिर, अ वेंसडे, फ्रॉड संय्या यांसारखे सिनेमे केले आहेत. याशिवाय तो अनेक झी टिव्हीवरील मालिकांमधेही काम करताना पहायला मिळाला आहे.

अघोरी, शक्ती, काला टीका व पवित्र रिश्ता यांसारख्या चांगल्या मालिकेतील महत्वपूर्ण भुमिका त्याच्या वाट्याला अनेकदा आल्या आहेत. मुळात दुसरीकडे शेफालीबाबत बोलायचं झालं तर पराग हा शेफालीचा दुसरा नवरा आहे. तिच्या पहिल्या पतीपासून काही कारणास्तव ती वेगळी झाली आणि आता तिचं परागसोबत नात चांगलच जुळून आलं आहे. मुझसे शादी करोगी, नच बलीये, बुगी वुगी, स्वीट हनी यांसारख्या प्रोजेक्ट्समधून तिला पडद्यावर पाहिल्या गेलं आहे.

“बेबी कम ना” या वेबसिरीजमधूनही तिने भुमिका साकारलेली पहायला मिळते. शेफाली जरीवालाच्या वाट्याला आजवर जरी जेमतेम ठराविक कामे आलेली असली तरी तिचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात तयार झालेला पहायला मिळतो. तिच्या सोशल मीडियावरील अनेक गोष्टींना चांगला प्रतिसाद रसिकप्रेक्षकांकडून मिळत असतो. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय राहतेच, शिवाय आपल्या अदांनी व भन्नाट फोटोंनी नेहमीच चाहत्यांना घायाळही करून सोडते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!