भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग त्याच्या कारकिर्दीत अनेक कारणांनी गाजला असल्याच आपल्याला पहायला मिळालं आहे. मुळात हरभजन सिंगच्या आयुष्यात कॉ’न्ट्रो’व’र्सी बऱ्याच झाल्या. तरीदेखील आपला हा पंजाबी माणूस एका गोड मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी विवाहबंधनात अ’ड’क’ला. अर्थातचं त्याची पत्नी एक सिनेसृष्टीतली उत्कृष्ट मॉडेल आहे. तुम्ही गीता बसरा हे नाव याआधीही ऐकलं असेलच.
ही बॉलीवुड अभिनेत्री आणि मॉडेल नुकतीच ३७ वर्षांची झाली. गीताने भारताच्या “टर्बनेटर” म्हणून ओळख असलेल्या हरभजन सोबत लग्न केलं. २०१५ या सालात दोघांचा एकमेकांशी विवाह पार प’ड’ला. हे लग्न तसं पाहता लव्ह मॅरेज होतं आणि त्याला नंतर अरेंज करण्याची जिम्मेदारी दोघांनीही आपल्या कुटुंबियांवर सोपवली. या दोघांची प्रेम-कहानी खरतरं एखाद्या सिनेमाप्रमाणेच आहे असं म्हणायला हरकत नाही.
प्रेमाच्या बाबतीत पंजाब आणि क्रिकेट यांच कदाचित गहन नातं असू शकतं. सिक्सर किंग युवराज सिंग, नवजोत सिंग सिद्धू आणि आपला हरभजन सिंग. तिघांच्याही वेगवेगळ्या फिल्मी प्रेमाच्या गोष्टी आहेत. एके काळी भारताच्या अव्वल फिरकीपटू गोलंदाजांपैकी हरभजन सिंग एक होता. त्याची दुसऱ्या संघात असलेली दहशतचं काही कमालीची होती.
हरभजन एखाद्या मोठ्या पार्टनरशीपची कशी सहज विकेट घेऊन द्यायचा हे सर्वांनाच माहीत आहे. हरभजन याच्याबद्दल तो क्रिकेटमधे असताना त्याचे नाव अनेक सिनेअभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमधे असल्याचे म्हटले जात होते, यात एके काळी दिपीका तर एके काळी चक्क बिपाशाचेही नाव समोर आले होते. परंतु या सर्व नावांना धु’ड’का’ळ’ल्या’चं समजलं ते तेव्हा जेव्हा हरभजन आणि गीता एकत्र आले.
हरभजन सिंग याने गीताला सर्वात आधी द ट्रेन या सिनेमातील “वो अजनबी” गाण्यात पाहिले होते. यानंतर हरभजन सिंगने युवराज सिंगकडे तिच्याबद्दल चौकशी केल्यावर युवराजनेही ती कोण आहे? हे ओळखत नसल्याचं सांगितलं. हरभजन यावर त्याला म्हणाला की, माहिती नाही तर माहिती करून घे.
लंडनमधे भारतीय संघाची सिरीज सुरू असताना हरभजनच्या या प्रेमाकथेची सुरूवात झाली होती. हरभजनचे बॉलीवुडमधे चांगले संपर्क असल्याने त्याला गीताबद्दल माहिती काढायला फारसा वेळ नाही लागला. तिच्या संपर्कात सर्वप्रथम आल्यावर त्याने तिला एका कॉफीसाठी आमंत्रित केले. गीतामात्र त्यावेळी गेलीच नाही. २००७ च्या ट्वेंन्टी ट्वेन्टी वर्ल्ड कपसाठी गीताने भज्जीला शुभेच्छा दिल्या.
याच दरम्यान दोघांची मैत्री थोडीफार वाढीस लागू लागली होती. दोघांमधे भक्कम रिलेशनशीप प्रस्थापित व्हायला नाही म्हणता ८ वर्षांचा कालावधी लागला. २०११ सालात सर्वत्र हरभजन आणि गीता यांच्या नावाचा बोलबाला प्रसारमाध्यमांमधे सुरू झाला. नोएडा सर्किट या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमातील हरभजन आणि गीता यांच्या एकत्र फोटोंची चर्चा त्यावेळी सर्वाधिक प्रकाशझोतात राहिली होती.
नाही म्हणायला ८ वर्षांचा वेळ घेत विचार करत दोघांनी शेवटी लग्नाचा निर्णय घेतला. आणि २०१५ या सालात दोघांचा विवाह अगदी था’टा’मा’टा’त पार पडल्याच पहायला मिळालं. दोघांनाही सध्या एक मुलगी आहे. त्या मुलीचं नाव “हिनाया” असं ठेवलं आहे. पंजाबी रितीरिवाजानुसार दोघांचही लग्न जालंधर येथील गुरूद्वारा या पवित्र ठिकाणी पार पडलं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!