टेलीव्हिजन इंडस्ट्रीमधून चांगल्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अर्थातचं अनिता हसनंदानी. ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असण्याच मुळ कारण म्हणजे तिने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. तिच्या बाळाकरता आणि तिच्या नव्या आई होण्याच्या पुढील वाटचालीसाठी तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्याचं पहायला मिळतं आहे.

छोट्या पडद्यावर चांगलचं वर्चस्व गाजवलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहत असल्याचीही नेहमीच पहायला मिळाली आहे. तिची रसिकप्रेक्षकांच्या मनामधे प्रचंड क्रेज तिने आपल्या अभिनय कौशल्यातून निर्माण केली आहे. आपल्या पहिल्यावहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर अनिता तिच्या चाहत्यावर्गासोबत आपल्या बाळाचे अनेक फोटो आणि छोटे व्हिडिओ शेअर करत असते.

तिच्या अनेक फोटोंवर भन्नाट असे कॅप्शनदेखील लिहलेले असतात, साहजिकचं प्रेक्षकवर्ग तिच्या हर एक पोस्टकडे आकर्षिल्या जातोचं. सध्याच्या घडीला तिने शेअर केलेल्या नव्या पोस्टची चर्चा सर्व सोशल मीडियावर रंगलेली पहायला मिळत आहे.

तिने त्या फोटोमधे बेबी बंप दाखवत कॅप्शनमधे मी आधीच यासाठी तयार आहे, असा कॅप्शन मांडल्याने अनेकांचा तर्क तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीकडे लागला असल्याचं पहायला मिळतं आहे. आपला नवरा रोहीत रेड्डि यासोबत तिने हा फोटो शेअर करताना असंही म्हटलं आहे की, “माझ्या बेलीला मी मीस करत आहे; माझी बेली सुंदर आहे, असं नाही की ती आता नाहीये पण थोडीशी कमी क्युट दिसल्या जाते, परंतु ठिक आहे. मी दुसर्‍या बाळासाठीही आता तयार आहे.”

अनिताच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिने आजवर तिच्या सर्व भुमिकांमधून प्रेक्षकांच यथोचित मनोरंजन केल्याचं पहायला मिळतं. केवळ हिंदी क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता तेलुगू, तमीळ भाषिक सिनेमे आणि ठराविक मालिकांमधूनही ती आजवर तमाम प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. खरतरं अनिता तिने आजवर साकारलेल्या भुमिकांपैकी सर्वाधिक लोकप्रिय अंजली या पात्राच्या भुमिकेमुळे झाली आहे.

स्टार प्लस या वाहिनीवरील काव्यांजली या मालिकेत तिचं हे पात्र पहायला मिळतं. याशिवाय बोलायचं म्हटलं तर “ये हे मोहब्बतें” सारखी उत्तम धाटणीच्या मालिकेतील शगुन अरोरा हे पात्र तिने निभावलं आहे. कलर्स टिव्हिवरील नागिन 3 आणि नागिन ४ यांमधेही तिच्या चांगल्या प्रकारच्या भुमिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत.

एकप्रकारे पाहिलं तर अनिताने तिच्या आजवरच्या 39 वर्षांच्या आयुष्यात भरपूर गोष्टी कमावल्या आहेत असं नक्कीच म्हणता येईल. सिंधी कुटुंबात मुंबईत जन्माला आलेल्या अनिताने आपल्या आवडीचं क्षेत्र निवडत सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. आणि आपली आवड व जिद्दीच्या जोरावर तिने आज स्वत:च वेगळं स्थान इथे या सिनेक्षेत्रात निर्माण केलं आहे.

अनिता तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरीच सक्रीय राहते, तिने व तिच्या नवऱ्याने दोघांनी मिळून पहिल्या बाळाला “आरव” हे नाव दिल्याची गोष्ट अनिताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनचं समजली आहे. टेलीव्हिजनच्या क्षेत्रात इधर उधर या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातून अनिताने आपलं पदार्पण केलं होतं. अनिताने अनेक हिंदी सिनेमेदेखील केले आहेत. “कृष्णा कॉटेज” या सिनेमाने तिची वेगळी ओळख त्या काळात निर्माण केल्याची पहायला मिळाली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!