बॉलिवुडमधे खरतरं एका अर्थी सलमान खान ज्या अभिनेत्रीसोबत एकदा काम करतो त्या अभिनेत्रीचं करियर एकप्रकारे वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतं, असं आजवर तरी सर्वांनीच पाहिलं व अनुभवलं आहे. यात काही एकदोन अभिनेत्री अपवाद असू शकतात. परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत तिने आजवर सिनेसृष्टीत चांगल्या भुमिका साकारल्याच्या पहायला मिळाल्या आहेत.
असं असूनदेखील तिने सिनेजगताचा अचानक निरोप का घेतला असावा हा प्रश्न सर्वसामान्य रसिकप्रेक्षकांना नक्कीच पडतो. तर ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती आहे आयेशा टाकिया. अर्थातचं वॉन्टेड सिनेमातली सलमान खान याची हिरोईन झालेली अभिनेत्री. आयशाने आजवर केवळ सलमानचं नव्हे तर जॉन अब्राहम, शाहिद कपूर, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारख्या उत्कृष्ट अभिनेत्यांसोबतही काम केलेलं आहे.
आयेशाने एकप्रकारे बॉलीवुडमधे आपलं यश संपादन केलचं होतं असं म्हणता येईल. तिने २००४ साली आलेल्या “टार्झन द वंडर कार” या सिनेमातून आपलं पदार्पण दमदार स्वरूपात रूपेरी पडद्यावर केल्याचं पहायला मिळतं. यानंतर दिल मांगे मोर, सोचा ना था, डोर, कॅश, संडे, पाठशाला, वॉन्टेड असे काही सिनेमे तिने केले.
प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी “सोचा ना था” या सिनेमातून दिग्दर्शकीय कारकिर्दीची तब्बल १६ वर्षे पूर्ण केली. या सिनेमात अभय देओल आणि आयेशा टाकिया हे दोघे प्रमुख भुमिकेतील कलाकार होते. आयेशा त्या काळात अगदी गोल चेहर्याची ठेवण असलेली, चेहऱ्यावर निरागस भाव दिसणारी, एक क्युट स्वरूपाची नवी नावारूपास येत असलेली अभिनेत्री होती. परंतु आज आयेशा पुर्णत: बदलून गेल्याची पहायला मिळते आहे.
2011 सालात आलेल्या मोड या चित्रपटात आयेशा शेवटची भुमिका साकारताना पहायला मिळाली होती. आयेशाचे वडील गुजराती तर आई एक मुस्लिम कुटुंबातून होती. आयेशाने 2009 सालात बिझनेसमॅन फरहान आजमी याच्यासोबत विवाह केला होता. सध्या त्या दोघांनाही एक मुलगा आहे. लग्नानंतरच्या दोन वर्षात मोड हा सिनेमा केल्यानंतर मात्र आयेशा पुढे कधीच फारशी सिनेसृष्टीत कुठल्याच बाबतीत पुढाकार घेताना पहायला मिळाली नाही.
अनेकांच्या मते लग्नानंतर कुटुंबियांकरता तिने सिनेजगताचा निरोप घेतला असू शकतो. आयेशाचे लग्नानंतर काही फोटो सतत चर्चेत राहिले त्याच कारण म्हणजे, पहिल्यापेक्षा आयेशा फारच वेगळी दिसू लागली होती. आयेशाने तिच्या ओठांची सर्जरी केल्याची माहिती अनेक माध्यमातून पुढे आली आहे.
अनेकांच्या मते तिच्या तिच्या शरीरासोबत फारच प्रयोग करत स्वत:ला खुप जास्त बदलून घेतलं आहे, मात्र तिने या गोष्टीला याआधी दोनचार वेळा नकारही दिला आहे. खरतरं बॉलीवुड जगतात अनेक गोष्टी क्षणार्धात बदलू शकतात. आज आहे, उद्या नाही, परवा असेल एकप्रकारे काहीशा अनिश्चिततांच प्रमाण या सिनेसृष्टीत अधिक असल्याच पहायला मिळतं.
आता आयेशा टाकिया हिचचं उदाहरण पाहिलं तर ती एक उभरती अभिनेत्री म्हणून सिनेजगतात वर येऊ लागली असतानाच अचानक थेट इंडस्ट्री सोडूनच गायब झाली. मागे काही दिवसांपूर्वी ती एका कार्यक्रमात आलेली पहायला मिळाली होती. आयेशा सध्या सोशल मीडियावर असते, परंतु तिथे ती फारशी व्यक्त होत नाही. बाकी आयेशाने अचानक सिनेसृष्टीत का सोडली? हे तिचं तिलाच खऱ्या अर्थी ठाऊक असेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!