हे नवीन वर्ष अनेक कलाकाराच्या आयुष्यात आनंद घेऊन येत आहे. कारण को’रो’ना’चा काळ सरत आहे आणि आता चांगले दिवस येण्याच्या तयारीत आहेत. एक मालिकेत काम करणारा अभिनेता खूप दिवसांनी बाप झाला आहे. म्हणजे त्याला बाप होण्याचं नशीब लाभलं असं आपण म्हणून शकतो. आता त्याचं नाव काय आणि तो कोणत्या मालिकेत काम करायचा चला तर मग जाणून घेऊ.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता लग्नाच्या जवळपास आठ वर्षांनंतर बाबा झाला आहे. नकुलच्या पत्नीने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी एका मुलाला जन्म दिला आहे.

नकुलने मुलाचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

नकुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाळाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘३ फेब्रुवारी २०२१… आमचा फोटो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेत्री क्रृतिका कामरा, अमोल पराशर, सैय्यमी खेर, ऋत्विक धनजानी, दृष्टी धामी, दिशा परमान अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

नोव्हेंबर महिन्यात नकुलनने त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे म्हटले होते. लग्नाच्या आठ वर्षांनंतर नकुल आणि जानकी मेहताने आई-वडिल होणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती.

नकुलने २०१२मध्ये ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर त्याने इश्कबाज, दिल वाले ओबेरॉय या मालिकांमध्ये काम केले. नकुलचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

त्याला याशिवाय दुसरा आनंद आयुष्यात नको होता. त्याला त्याच्या बायकोला आई बाबा होण्यासाठी आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.