हिंदी असो किंवा मग मराठी. तो त्याच्या अभिनयाचा जलवा दाखवून मोकळा होतो. तो असं काम करतो की स्मरणात राहतं. कायमचं सोबत राहणारं काम ग्रेट असतो. जे एक प्रसिद्ध लोकप्रिय असा अभिनेता करतो.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो कोण ? ज्याचा आज वाढदिवस आहे. नाटक असुद्या किंवा सिनेमा नाहीतर वेबसिरीज. हा माणूस अभिनय खूप भारी करतो.
जसं की अभिनय उकळून पिलाय. त्या प्रसिद्ध कलाकाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन आपण त्याविषयी काही जाणून घेणार आहोत.
जितेंद्र जोशी हे नाव कोणत्याही प्रेक्षकाला नवीन नाही. मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. मालिका, नाटक, चित्रपट किंवा वेब सीरिज प्रत्येक माध्यमामध्ये तो अभिनयातून व्यक्त झाला आहे.
त्यामुळेच आज त्याचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिनय म्हणजे कायदेखील जितेंद्रला माहित नव्हतं
शालेय जीवनात असल्यापासून जितेंद्रला अभिनय करण्याची आवड होती. मात्र, नेमका अभिनय म्हणजे हे त्याला ठाऊकच नव्हतं. इतकंच काय तर वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंत नाटक म्हणजे काय असतं हेदेखील त्याला माहित नव्हतं.
विशेष म्हणजे वयाच्या १६-१७ व्या वर्षापासून जितेंद्रने नाटकात काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला.
माहीत नसलेल्या गोष्टी शोधल्या की माणूस शिकून मोठा होतो, याच तत्वाने तो आज इथपर्यंत पोहचला आहे.
मराठी नाटक त्याचे दोन स्पेशल म्हणून ही खूप गाजले होते. त्याआधी 2013 ला दुनियादारी सिनेमात त्याचं मेव्हणे मेव्हणे हे पात्र ही खुप गाजलं होतं.
अश्या जगावेगळी अभिनय रचना अस्तित्वात आणणाऱ्या अभिनेत्यास वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा. तो कवी ही आहे.