poonam rajput

मिर्झापूर या वेब सीरिजचा दुसरा भाग सध्या अ‍ॅमेझॉन प्राइमवर ‘भौकाल’ करत आहे. मिर्झापूर -१ मध्ये, जिथे कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल), बबलू पंडित (विक्रांत मस्से) आणि मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा) यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं होतं.

त्याप्रमाणे मिरजापूर -२ काही महिला पात्रांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. वेब मालिकेच्या उत्तरार्धात अभिनेत्री ईशा तलवार, मेघना मलिक आणि पूनम राजपूत ही काही नवीन पात्र आहेत. अभिनेत्री पूनम राजपूतची भूमिका जरी अगदीच लहान असली तरी मिर्झापूर -2 मधील तिची भूमिका खूपच चर्चेत आली आहे. रातोरात ती सुपरस्टार बनली आहे.

कुणालाही माहीत नसलेल्या अभिनेत्रीचं पात्र खूप लोकप्रिय झोलेलं आहे. जिचं खरं नाव आहे, पूनम राजपूत. पण कोण आहे ती ? आधी कुठं काम केलं ? वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. कुणालाही काहीच माहीत नसेल. चला तर मग आपण जाणून घेऊयात की कोण आहे पूनम राजपूत ?…

मिर्जापूर -2 मध्ये पूनम राजपूतची भूमिका काय आहे?

मिर्झापूर -२ मध्ये कालिन भैय्याच्या पाठिंब्याने पुन्हा विजयी झालेल्या सूर्य प्रताप यादवची, राठीशंकर शुक्ला यांचा मुलगा शरद शुक्ला (अंजुम शर्मा) हा कार अपघातातून हत्या करतो. सूर्य प्रताप यादव यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू जे.पी. यादव (प्रमोद पाठक) यूपीचे मुख्यमंत्री बनण्याच्या उंबरठ्यावर असतात आणि शपथविधी होण्यापूर्वीच शारीरिक छळाचा ते उत्सव साजरा करतात.

येथूनच पूनम राजपूत प्रवेश करते, जो कालीन भैय्याच्या सांगण्यावरून जेपी यादव यांना एका घोटाळ्यात अडकविण्यासाठी कॉल गर्ल म्हणून भावी मुख्यमंत्री यांच्याकडे आलेली असते.

पूनम राजपूत यांनी जे.पी. यादव यांना नशाचा शॉट देऊन व्हिडिओ बनवते आणि दुसर्‍याच दिवशी जनता दरबारात जाऊन मुख्यमंत्र्यांची पोल उघड करते. विधवा महिला म्हणून पूनम राजपूत यांनी आम दरबार गाठते आणि सीएम जेपी यादव यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करते.

हे चित्र माध्यम प्रसारित होतं. यानंतर जेपी यादव यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकलं जातं आणि माधुरी यादव (ईशा तलवार) राज्याच्या नव्या मुख्यमंत्री बनतात. पूनम राजपूतने केवळ अवघ्या काही वेळाच्या या छोट्या भूमिकेतून मिर्जापूर -2 मध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे.

पूनम राजपूत कोण आहे ?…

हिमाचल प्रदेशातील पालमपूरमधील असणारी पूनम राजपूत हिने हिंदी व पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. मिर्जापूर -2 पूर्वी पूनम राजपूतने ‘डान्स बार’ या वेब सिरीजमध्येही काम केलेलं आहे.

पूनम राजपूतने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरूवात २०१७ च्या ‘बेगम जान’ या चित्रपटाने केली होती. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी पूनम राजपूत तिने ‘सीआयडी’, ‘चंद्रकांत’, ‘ना बोले तुम ना मैने कुछ कहा आणि कोड रेड यासारख्या काही टीव्ही मालिकांमध्ये काम केलेलं होतं. तसेच यापूर्वी २०१५ मध्ये पूनम राजपूतने ‘व्हॉट द जट’ चित्रपटाद्वारे पंजाबी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.

पूनम राजपूत ला पुढील भावी वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा..