गँग्जस ऑफ वासेपुर हा चित्रपट कुणी पाहिला नसेल असा एखादाच असेल. ज्यांनी पाहिलेला आहे, त्यांना अभिनेता मनोज वाजपेयीची दुसरी बायको आठवतच असेल.
सरदार खान च्या बंगाली बायकोची भूमिका करणारी रिमा सेनचा आज वाढदिवस. रिमा सेन ला आपण बोल्ड अभिनेत्री म्हणूनच जास्त पाहिलेलं असेल. मग फोटोशूट सुद्धा तिचं बोल्डचं असतं.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रीमा सेन आपला वाढदिवस आज 29 ऑक्टोबरला साजरी करीत आहे.
तिने ‘मालामाल वीकली’, ‘जला: द ट्रॅप’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपुर’ यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. रीमा सेनचा जन्म 1981 मध्ये कोलकाता येथे झाला होता. कोलकत्ता येथून तिने प्राथमिक शिक्षण घेतलं.
चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी रीमा सेनची ओळख ही प्रसिद्ध बोल्ड मॉडेल म्हणून होती. तिने करियरचा बराच काळ मॉडेलिंग केलं. यानंतर तिने अनेक जाहिरात कंपन्यांसाठी काम केलं. पुढं चालून काही बंगाली चित्रपट आणि मालिकांमध्ये ती दिसली.
मुख्य अभिनेत्री म्हणून, रीमा सेन यांनी आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपट ‘चित्रम’ पासून केली. रीमा सेनचा हा चित्रपट हिट ठरला. तिथं अभिनेत्री म्हणून तिला खरी ओळख मिळाली, जी आजपर्यंत आहे आणि दिवसेंदिवस लोकप्रियता ही वाढतच आहे.
रीमा सेनने तेलुगु, तमिळ आणि कन्नड चित्रपटांसाठी बराच काळ काम केलं. 2001 मध्ये ‘हम हो गया तुम’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये अभिनय केला होता. या चित्रपटात अभिनेता फरदीन खान, रीमा सेन यांच्यासह मुख्य भूमिकेत होता.
रीमाचा पहिला बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. पण तरीही तिला बॉलिवूड मध्ये त्यानिमित्ताने एन्ट्री मात्र जरूर मिळाली.
रीमा सेन ने खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं ते मालामाल विकली मधून. मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला. तसेच, रीमा सेनेच्या कामगिरीचेही कौतुक झालं. रीमा सेनने आपल्या कारकीर्दीत एकूण आठ बॉलिवूड चित्रपट केले आहेत.
ती अखेर अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुरमध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने मनोज बाजपेयी यांची दुसऱ्या पत्नीची भूमिका केली होती.
2006 मध्ये रीमा सेन तिच्या एका बोल्ड फोटोशूटमुळे कायदेशीर वादात अडकली होती. तमिळ वृत्तपत्रासाठी तिने हे फोटोशूट केले होते. मदुरै कोर्टाने रीमा सेनविरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल केलं. शिल्पा शेट्टी यांचे नावही रीमाबरोबरच होतं.
या दोन्ही अभिनेत्रींवर असा आरोप होता की रीमा आणि शिल्पाने घेतलेली फोटो खूप अश्लील होती. सध्या रीमा सेन बिझनेसमन शिव करणसिंगशी लग्न करून फिल्मी दुनियेपासून दूर आहे.
तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !…