होय हे खरं आहे व्यवसायवृद्धीसाठी 50 लाख रुपयांचा फंडिंग लवकरच मिळणार आहे. ही कुठली स्कीम नाही किंवा थोतांड ही नाही. ही आहे स्टार्ट अप स्टुडिओची अभिनव संकल्पना… मराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी , त्यांच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी 50 लाख रुपयांचा फंडिंग तसेच व्यवसाय कुशलतेने हाताळण्यासाठी प्रशिक्षण सुद्धा स्टार्टअप स्टुडिओ देणार आहे .तर अगोदर आपण स्टार्ट अप स्टुडिओ ही संकल्पना समजावून घेऊ.
जे मराठी तरुण-तरुणी व्यवसायात आहेत किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात .मग तो कोणताही असो ,अशा जिद्दी लोकांसाठी इंडिया नेटवर्कचे उद्योजक, गुंतवणूकदार आणि प्रेरक वक्ता राहुल नार्वेकर घेऊन आले आहेत एक भन्नाट संकल्पना जिचे नाव आहे स्टार्टअप स्टुडिओ..

इंग्रजी भाषेत पारंगत नसणाऱ्या मराठी उद्योजकांच्या बोटाला धरून व्यवसायात एक पाऊल पुढे घेऊन जाण्यासाठी या स्टार्ट अप स्टुडिओचा जन्म झाला आहे. हा स्टार्टअप स्टुडिओ मराठी उद्योजकांना मराठी आणि हिंदी भाषेमधून व्यवसाय पुढे कसा घेऊन जायचा ? यावर अभ्यासक्रम तयार करून त्याचे प्रशिक्षण सुद्धा देणार आहे. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचे असून आजपासून एक मे 2020 पर्यंतच तुम्ही अर्ज करू शकता. समजा तुमची या निवड प्रक्रियेमध्ये निवड झाली तर तुमच्या बॅचला स्वतःचे स्टार्टअप कसे सुरु करावे ? या विषयावर सात दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे .तसेच पुढच्या सहा महिन्यांसाठी तुमच्या व्यवसायाला संबंधित तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभणार आहे .शिवाय व्यवसायवृद्धीसाठी तब्बल पन्नास लाखांचे भांडवलही मिळणार आहे.

तसेच पुढे निधीची उभारणी कशी करायची ? यावर ही मदत केली जाणार आहे .या नेटवर्कला तुमच्यासारख्या हुशार आणि लाथ मारेल तिथे पाणी काढेल.अशा ध्येयाने पेटलेल्या 25 जणांची आवश्यकता आहे . या 25 लोकांच्या तुकडीला ईडीआय आणि आयआय एम ए येथे आठवड्याभराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम तब्बल सहा महिन्यांचा असणार आहे. या प्रकारे आम्ही जगभरातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचे नेटवर्क उभारणार आहोत. जे पुढील फेरीत भाग घेतील.

आमचा उद्देश हा उद्योजकांच्या क्षमता ओळखणे, त्यांचे कुठलेही शोषण होऊ न देता पालनपोषण करणे. त्यांना पुढील स्तरावर घेऊन जाणे हा आहे. पुढील दोन वर्षात आमच्याकडे चार बॅच सह शंभर स्टार्ट अप ची एक स्ट्रॉंग टीम असणार आहे, आणि हा खटाटोप फक्त मराठी उद्योजकांना जगाच्या नकाशात झळकवण्यासाठी चाललेला आहे. तेव्हा वाचकहो तुम्ही सुद्धा आपल्या मराठी माणसांसाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून मराठी नवउद्योजक घडविण्यासाठी या चळवळीत भाग घ्या..
रजिस्ट्रेशन साठी लिंक : TheIndianetwork.in
धन्यवाद