आपल्या सगळ्यांची लाडकी ‘झी युवा’ वाहिनी, ‘डॉक्टर डॉन’ ही जबरदस्त मालिका आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. डॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीन अल्पावधीतच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री श्वेता शिंदे हिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलेलं आहे. अर्थात, इतक्या वर्षांनंतर सुद्धा तिच्या दिलखेचक अदा आणि लक्षवेधी सौंदर्य यात फरक पडलेला नाही. आजदेखील तिच्या सौंदर्याची छाप प्रेक्षकांवर पडते आहे. मेडिकल कॉलेजच्या एका शिस्तप्रिय आणि कठोर डीनची भूमिका ती साकारते आहे. कॉलेजची ही डीन, डॉक्टर डॉनच्या, म्हणजेच तिच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली आहे.

विद्यार्थ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली शिक्षिका म्हटलं, की ‘मैं हू ना’ चित्रपटातील सुश्मिता सेन नक्कीच आठवते. अर्थात, या दोन भूमिकांमध्ये फारसे साम्य नसले, तरीदेखील सुश्मिताचा आणि श्वेताचा लुक सारखा असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘डॉक्टर डॉन’मधील मोनिका साकारण्यासाठी, श्वेताने सुश्मिताच्या ‘मैं हू ना’ चित्रपटातील भूमिकेच्या लुकचा आदर्श समोर ठेवलेला आहे. ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ डार्लिंग डीन प्रेक्षकांना सुद्धा खूप पसंत पडली आहे.

तिच्या या नव्या भूमिकेविषयी बोलताना श्वेता म्हणते; “मला या भूमिकेबद्दल सांगण्यात आलं, त्यावेळी सुश्मिताचे फोटो दाखवण्यात आले होते. मालिकेतील माझा पेहराव आणि लुक अगदी तसाच असेल असं मला सांगण्यात आलं. सुश्मिता माझी आवडती अभिनेत्री आहे, त्यामुळे तिच्यासारखं दिसायचं आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती. आज प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते आहे. अशावेळी कष्टांचं चीज झालं असल्याचं लक्षात येतं.