‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘तान्हाजी’ची घौडदौड सुरूच आहे. ‘तान्हाजी’ हा सिनेमा यंदाचा 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल, असे दिसतेय. सिनेमातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकांना रसिकांनी पसंती दिली.

बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा ‘तान्हाजीः द अनसंय वॉरियर’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचं मुळ गाव असलेल्या ‘गोडवली’गावचा चित्रपटात उल्लेख न केल्यानं गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपटात तान्हाजींचे जन्मगाव असलेल्या गोडवली गावाकडे दुर्लक्ष केलं आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाची निर्मिती करण्याआधी आम्हाला चित्रपटामध्ये गावाचा उल्लेख होणार असल्याचा शब्द दिला होता. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावर गावचा कुठेही उल्लेख नाही, असं गोडवलीच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
आम्ही याविषयी सर्व गोडवली ग्रामस्थांतर्फे निर्माते-दिग्दर्शकांना पत्र लिहिलं असून त्यावर आम्हाला सकारात्मक उत्तर न मिळाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, मंगळवारी मुख्यमंंत्र्यांनी सर्व मंत्रिमंडळासह चित्रपट पाहणार असल्याचं सांगितलं. एकीकडे तान्हाजी चित्रपट दिवसेंदिवस चित्रपटगृहात गर्दी ओढू लागला असून चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.