हिंदु धर्मामध्ये नारळाला विशेष महत्व आहे,कोणत्याही सण समारंभात नारळाचा उपयोग केला जातो.नारळाला श्रीफळ म्हणजे देवाचे फळ असे देखिल म्हटले जाते,पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का,की देवापुढे नारळ का फोडला जातो. ? चला तर मग जाणुन घेऊया देवापुढे नारळ का फोडला जातो.
पुर्वीच्या काळात देवाच्या पुढे पशुचा बळी देण्यात येत असे,कारण देवाला प्रसन्न करण्यासाठी लाल रक्त हवेच असा समज पूर्वीच्या लोकांच्या मनात असे.
पण पशूंची हत्या हे हिंदू धर्माला न शोभणार कृत्य होते,म्हणुन त्या काळातील ऋषी मुनींनी एक युक्ती काढली,देवाला लाल रक्त दाखवण्यापेक्षा त्यांनी दगडाला शेंदुर फासला व नारळाचे पाणी त्यावरती शिंपडले तेव्हापासून शेंदूर फासलेले दगड आपण मंदिर परिसरात पाहतो व त्याचवेळेपासून देवापुढे पशुहत्या न करता नारळ फोडण्याची प्रथा रुजू झाली.
इतर कोणते फळ न वापरता फक्त नारळच का ? तर मित्रांनो नारळ हे फळ १२ महिने २४ तास अगदी सहज उपलब्ध होणारं फळ आहे,म्हणून नारळाचाच वापर करण सोयीस्कर ठरत.