नमस्कार मित्रांनो स्टार मराठी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो ह्या निसर्गात नाना प्रकारची फळे आहेत पण आज आपण जाणुन घेणार आहोत पपई मध्ये असलेल्या गुणकारी फायद्यांबद्दल. पिवळ्या रंगाचे उभट आकाराचे व चवीला सपक गोड असणारे हे फळ खरच आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे.

पपई मध्ये प्रोटीन व्हिटॅमिन पोटॅशियम कॅल्शियम व फॉस्फोरस यांचे प्रमाण भरपुर असते. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे असते म्हनुनच डॉक्टर आपल्याला पपई खाण्याचा सल्ला देतात. पपई खाल्ल्याने अंगदुखी स्नायुदुखी त्वजेचे रोग तसेच पोटात होणारे गॅस यासारखे आजार लिलया बरे होतात.पपई खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती दुप्पटीने वाढते.

तुम्ही पाहिले असेल आपल्या घरातील वयस्कर लोक म्हणजेच आपले आजी आजोबा आपल्याला पपई खाण्याचा आग्रह करत असतात पण आपण काहीतरी कारण सांगुन त्यांना टाळत असतो,पपई मध्ये असलेल्या गुणकारी फायद्यांमुळे च ते आपल्याला पपई खाण्यास सांगतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

काही पपया चवीला एकदम सपक असतात अजिबात गोड नसतात पण म्हणतात ना जे जिभेला चांगले नसते ते शरीराला चांगले असते. चला तर मग आजपासून पपई चे भरपुर सेवन करुया व आजारांना पळवुन लावुया.