अनेक चित्रपटांतून अापल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकर आता “चोरीचा मामला” या चित्रपटात धमाल भूमिकेत दिसणार आहे. अमृतानं “चोरीचा मामला” या चित्रपटात श्रद्धा ही महत्त्वाची भूमिका साकारली असून, तिचा चित्रपटातील लूक सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला.
“मस्का” या चित्रपटानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून “चोरीचा मामला” हा दुसरा चित्रपट आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओज निर्मित सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शननंच चित्रपटाचं लेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील नंदन या व्यक्तिरेखेतील जितेंद्र जोशीचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता अमृताचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हातात पिस्तुल असलेली ग्लॅमरस अमृता या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे पिस्तुल आणि “चोरीला मामला” यातील संबंध चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावरच कळेल.