ज्या शतकात रुढी आणि परंपरा यांचा प्रचंड पगडा होता आणि स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवण्याचं स्वातंत्र्य देखील नव्हतं, त्याकाळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदरानं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात घेतलं जातं.एकोणिसाव्या शतकात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आनंदी गोपाळ जोशी बोटीने अमेरिकेला गेल्या. तेव्हा त्या १८ वर्षांच्या होत्या. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणून आनंदी गोपाळ जोशी आजही ओळखल्या जातात. त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून गोपाळ जोशी यांनी फक्त आनंदीबाईंना प्रोत्साहितच केलं नाही तर संपूर्ण समाजाचा विरोध पत्करला. या ध्येयवेड्या जोडप्याच्या असामान्य आणि प्रेरणादायी संघर्षाची गोष्ट ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात मांडली आहे. लवकरच प्रेक्षक झी टॉकीज वाहिनीवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

आनंदी-गोपाळ या दाम्पत्याचा परिस्थितीबरोबरचा झगडा अनुभवायचा असेल, तर ‘आनंदी गोपाळ’ हा सिनेमा पाहायला विसरू नका रविवार 22 सप्टेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर.