बहुचर्चित चित्रपट धुमस च्या ट्रॅलरने आणि गाण्यांनी पडळकर आणि जानकर साहेबांच्या चाहत्यांची उत्सुकता शीगेला पोहचवली होती .मात्र आज अखेर धुमस संपुर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला .पुण्यातल्या लक्ष्मी नारायण ,सिटी प्राईड ,मंगला ,निलायम अश्या बऱ्याच थेटरला धुमस चित्रपट प्रदर्शित झाला .बरयाच थेटरमध्ये प्रेक्षकांनी उत्तुंग प्रतिसाद देत धुमस टीमच कौतुक केलं .
राजकीय पडद्यावर तर गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर सुपरहिट ठरत आहेत मात्र गुलामगिरीतून मुक्त होऊन नागरिकांनमध्ये सजगता येणं गरजेचे आहे ही इच्छा चित्रपटाच्या माध्यमातून समोर त्यांनी आणली. मराठी सिनेसृष्टीत धुमस चित्रपट एक वेगळा प्रयोग आहे ,सध्या महाराष्ट्राला कशा विचारांचा मुख्यमंत्री असावा,त्याची जनतेच्या हिताची धोरण कशा पद्धतीची असायला पाहिजेत हे धुमस चित्रपटात दाखवले आहे असं प्रेक्षकांनी सांगितले आहे .प्रेक्षकवर्ग धुमस चित्रपटावर खूप खुश आहे .थेटरमधून बाहेर जाताना एक वेगळा विचार घेऊन प्रेक्षक जात आहे .
गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर आणि धुमस च्या टीमने महाराष्ट्राचं जे व्हिजन मांडले आहे त्याला प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे . बऱ्याच ठिकाणी धुमसने हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले आहेत . प्रेक्षकांनी चित्रपटातल्या सगळ्या गाण्यांवर डान्स करत धुमाकूळ घालून प्रचंड प्रतिसाद दिला . लक्ष्मी नारायण थेटरमध्ये चित्रपटातील कलाकार शोला उपस्थित राहिले होते . विशाल निकम,साक्षी चौधरी ,रोहन पाटील दिग्दर्शक शिवाजी दोलताडे धुमसच्या शोला उपस्थित राहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. फस्ट डे फस्ट शोला प्रेक्षकांचा राडा धुमाकूळ बघून नक्कीच धुमस हाऊसफुल्ल सुपरहिट जाणार यात काही शंका नाही .