भविष्याची ऐशी तैशी – द प्रेडिक्शन’ प्रदर्शित होतोय ६ ऑक्टोबर ला ! Bhavishyachi Aishi Taishi Upcoming Marathi Movie
वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं आणि आता टेलिव्हिजनसुद्धा भविष्यावर बोलू काही म्हणत वर्षानुवर्षे लोकांचं भविष्य सांगताना दिसत आहेत. एखाद्या व्यसनाप्रमाणे करोडो लोकं ते वाचत/बघत असतात. बरं लिहिलं नसेल तर ते चुकचुकतात आणि बरं लिहिलं असेल तर थोडा वेळ आनंदी होतात.
जगात हात, नाडी, कपाळ, चेहरा, पत्रिका, कुंडली ई. बघून लोकांची भविष्य सांगणारे बरेच भविष्यवेत्ते समाजात सर्व थरांतून सापडतात. बऱ्याच ढोंगी ‘बाबांमुळे’ अशा लोकांवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय. परंतु या शास्त्राला विज्ञानाची जोड देत भविष्य चांगलं होण्यासाठी वर्तमानात उपाय सांगणारे ज्योतिषीही कार्यरत आहेत आणि त्यांच्या ज्ञानत्वाचा आधार घेणारे मोठमोठ्या व्यक्तीही आहेत.
याच विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण लेखन चंद्रा तलवारे यांनी केलं असून त्यावर रमेश तलवारे एका चित्रपटाची निर्मिती करीत आहेत ज्याचं नाव आहे ‘भविष्याची ऐशी तैशी – द प्रेडिक्शन’.रमेश तलवारे मुव्हीज प्रस्तुत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे सुरेंद्र वर्मा यांनी. चित्रपटासंदर्भात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. रामायण आणि महाभारत घडतानांचा दृष्टांत त्याना रचणाऱ्या वाल्मिकी आणि व्यासमुनींना झाला आणि त्यांनी त्या ग्रंथांची रचना केली. त्यावरून लक्षात येते की भविष्य निश्चित जाणता येते, फक्त ते जाणण्याची क्षमता असली पाहिजे.
तुम्ही ती क्षमता नसलेल्या ज्योतिषाला जर विचारले तर तुम्हाला योग्य उत्तर कसे मिळेल ? आणि म्हणूनच नशिबाच्या मागे न जाता आपल्या अथक प्रयत्नावर जास्त विश्वास ठेवावा असा मौलिक संदेश ‘भविष्याची ऐशी तैशी’ या चित्रपटाच्या लेखिका चंद्रा तलवारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्या पुढे म्हणाल्या ‘पृथ्वीतलावरील मानवी जीवन हे भविष्याच्या आधारावर अवलंबवून असल्यामुळे चांगले भविष्य घडविण्यासाठी प्रत्येकाची नित्यपणे धडपड सुरु असते. यामुळे मनुष्य-जीवनात भविष्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असल्यामुळे “भविष्याची ऐशी तैशी -द प्रेडिक्शन” या चित्रपटातील तीन मैत्रिणी याला अपवाद नाही. त्यांच्यातील मेघाचा ज्योतिषावर ठाम विश्वास असतो तर प्रियाचा भविष्यवार अजिबात विश्वास नसतो तूळ राशीची निशा मात्र या बाबतीत सुद्धा गोंधळलीच असते. तिला कधी मेघाचे विचार पटतात तर कधी प्रियाचे. एके दिवशी करमरकर नामक ज्योतिष्याने केलेली भविष्यवाणी त्यांच्या आयुष्यात वेगळे वादळ घेऊन येते विश्वास ठेवण्यास मेघाचे मन तयार होत नाही आणि परंपरेचा पगडा असल्याने तिची मानसिक स्थिती बिघडते आणि जर ज्योतिषाने सांगितलेले खरे ठरले तर या भीतीने होणारी मेघाची होणारी तारांबळ कशी होते हे चित्रपटात मनोरंजक पद्धतीने मांडलं आहे’. चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते देखील त्यांच्याच लेखणीतून उतरली आहेत.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वर्षा उसगांवकर, मानसी नाईक, रुचिता जाधव, हर्षाली झिने, लिम्का बुक मध्ये रेकॉर्ड झालेले ज्योतिषाचार्य संदीप कोचर, आसावरी जोशी, स्वप्निल जोशी (नवीन ), पंकज विष्णू, आनंदा कारेकर, किशोर नांदलस्कर,तसेच प्रविण तलवारे यांनी विशेष भूमिका साकारली आहे.
येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात “भविष्याची ऐशी तैशी -द प्रेडिक्शन” प्रदर्शित होणार आहे .