swapnil-joshi-launches-motion-poster-of-his-upcomming-movie-fugay-on-his-birthday




Swapnil Joshi Launches Motion Poster

स्वप्निलने वाढदिवशी कापला ‘फुगे’ Fugay चित्रपटाचा केक

स्वप्निल-सुबोधचा याराना प्रथमच या मोशन पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला.

नवीन प्रयोग आणि नवीन संकल्पनांनी बहरलेले अनेक चित्रपट आता मराठीत येत आहेत. अशा या नावीण्यतेने नटलेल्या चित्रपटांची रंगत आणखीन वाढवण्यासाठी चित्रपटांची नावेदेखील हटके ठेवण्याचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. सिनेमांच्या हटके नावांच्या यादीत आगामी ‘फुगे’ या सिनेमाचा देखील समावेश होत आहे. ‘मितवा’ फेम दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फुगे’ या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा होत आहे.

fugay-marathi-movie-star-cast



Fugay 2016 Marathi Movie Mp3 Songs Free Download

धम्माल मस्तीने भरलेल्या या चित्रपटाचे नुकतेच मोठ्या उत्साहात मोशन पोस्टर आणि टायटल साँगचा टीझर लाँच करण्यात आला. सिनेमातील सर्व स्टारकास्टच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मराठीचा सुपरहिरो आणि या सिनेमातील प्रमुख कलाकार स्वप्निल जोशींचा वाढदिवसदेखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

star-cast-fugay-marathi-movie

तत्पूर्वी, ‘फुगे’ Fugay 2016 या चित्रपटाच्या नावाला साजेसे असे ‘हे फुगे’ हे मजेशीर शीर्षकगीत उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे या मराठीतील दोन तगड्या अभिनेत्यांवर आधारित असलेल्या या गाण्याचे टीझर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणारे ठरेल. मंदार चोळकर लिखित या गाण्याला बॉलीवूडचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक रोचक कोहली यांनी संगीतबद्ध केले आहे.

subodh-swapnil-fugay-marathi-movie

शिवाय सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि सिद्धार्थ महादेवन यांनी हे गाणे गायले आहे. तसेच कोरिओग्राफर उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. मोठ्या पडद्यावरील ‘हे फुगे’ या गाण्यात स्वप्निल-सुबोधची केमिस्ट्री अगदी रंगात आलेली दिसून येतेय.

fugay-marathi-movie-poster

स्वप्नीलच्या मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील मध्यमवर्गीय आणि पुण्याच्या स्वाभिमानी नायकाची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती त्यामुळे पुन्हा आता तशाच काहीशा भूमिकेत स्वप्निल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच आपल्या गंभीर आणि ऐतिहासिक भूमिकांतून रसिकांच्या मनात राज्य करणारा सुबोध भावे मात्र यावेळी एका हटके भूमिकेत दिसणार आहे.



आजचा मॉडर्न आणि डेनिम घालणाऱ्या मनमौजी तरूणाच्या भूमिकेत तो दिसणार आहे. फुगे सिनेमाच्या पोस्टरलाही कार्यक्रमात मोठी पसंती मिळाली. स्वप्निल-सुबोधचा याराना प्रथमच या मोशन पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला.

subodh-bhave-fugay-marathi-movie-poster

हा मोशन पोस्टर पाहताना प्रथमदर्शनी स्वप्निल-सुबोध यांच्यातली मैत्री दिसून येते, मात्र त्यादरम्यान दोघांच्या हातावर गोंदलेली एकमेकांची नावे पाहिल्यानंतर ही नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. शिवाय पोस्टरवरील या दोघांमधून उडत जाणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांमुळे हा सिनेमा नक्कीच एका वेगळ्या धाटणीचा असल्याचे समजून येते.

Fugay 2016 Marathi Movie Mp3 Songs Free Download

एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देण्यास सज्ज झाला आहे. शिवाय स्वप्निल आणि सुबोधला प्रथमच एकत्र पाहण्याचा योगही या चित्रपटाद्वारे जुळून आला असल्यामुळे ही रसिकांसाठी दुहेरी मेजवानी ठरणार आहे.

 

swapnil-joshi-fugay-marathi-movie-poster

 

subodh-swapnil-fugay-movie-poster

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here