Zee Yuva’s Prem He Fourth Story ‘Gudhi Premachi’ Lalit Prabhakar ,Bhageshree Mote
गुढी प्रेमाची “प्रेम हे “ची चौथी कथा झी युवावर
अनेकदा आपण आयुष्यात अश्या काही लोकांना भेटतो ज्यांच्याशी आधी कधीही संबंध आलेला नसतो . पहिला पहिला ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही , पण हळू हळू कधी ती व्यक्ती आपलीशी होते हे कळतंच नाही . आणि जेव्हा वेगळं व्हायची वेळ येते तेव्हा मात्र मनाला एक वेगळीच हुरहूर लागून जाते आणि एकमेकांच्या नकळत प्रेमाची गुढी उभी राहते . प्रेम हे ची या सोमवारी येणारी नवीन गोष्ट ” गुढी प्रेमाची “ ही गोष्ट आहे २ पेइंग गेस्ट असलेल्या दोन व्यक्तींची … अमृता आणि स्वप्नीलची … इच्छा नसतानाही एकेमकांबरोबर एक रूम शेअर करत असताना कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यानांच कळत नाही .गुढी पाडवा निम्मित झी युवाची ही खास भेट येत्या सोमवारी २७ मार्च आणि मंगळवार २८ मार्च ला रात्री ९ वाजता, आपल्याला Lalit Prabhaka ललित प्रभाकर आणि Bhageshree Mote भाग्यश्री मोटे यांचे अदाकारीने एक सुंदर निरागस प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.
स्वप्नील हा एका श्रीमंत घरातील मुलगा , पण बिझिनेस मुळे वडलांना त्याच्याकडे लक्ष देता आले नाही . लहानपणापासून तारुण्यापर्यंत अख्खा प्रवास एकट्याने केल्यामुळे त्याला आयुष्यात कोणाचीही साथ नको आहे . स्वप्नील वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी मुंबईत आला आणि त्याला एका कंपनीत सेल्समन म्ह्णून नोकरी सुद्धा मिळाली.
पण तरीही स्वप्नीलच स्वतःचा मोठा बिझिनेस उघडायचं स्वप्न मनाशी आहे तर अमृता सुद्धा तिचं आधीच प्रेम विसरण्यासाठी आणि स्वतःची डान्स अकादमी उघडण्याच्या उद्देशाने मुंबईला आली. ह्या दोघांच्या गोष्टीला सुरुवात होते ते प्रॉपर्टी एजंटच्या घोळामुळे .प्रॉपर्टी एजंट ह्या दोघांना एकच रूम ऑफर करतो आणि पर्याय नसल्यामुळे ह्या दोघांनाही ही रूम शेअर करावी लागते .
सर्वांपासून अलिप्त होऊन एकटे राहणाच्या मनीषेने आलेले हे दोघंही आता इच्छा नसतानाही एकत्र राहतात . सुरुवातीपासूनच दोघांमध्ये तु तू मै मै सुरु होते . आता एक मुलगा आणि मुलगी एकाच रूम मध्ये … ते कसे राहतात .. त्यांच्यात नक्की काय काय होते आणि नंतर ते रूम शेअर करता करता खरंच आयुष्य सुद्धा शेअर करतात का की काहीतरी वेगळंच होते ? … हे सर्व पाहण्यासाठी झी युवावरील प्रेम हे या मालिकेतील “गुढी प्रेमाची “. ही गोष्ट पाहणे उत्कंठावर्धक नक्कीच ठरेल.
“गुढी प्रेमाची ” ही झी युवाची संकल्पना असून ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मोटे हे मुख्य भूमिकेत आहेत, तर तुषार गुंजाळ यांच्या लेखणीतून कथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे . दर सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता वेगवेगळ्या कथांतून “प्रेम हे” झी युवावर उलगडत जाईल.