Zee Yuva’s Nave parvo Shaurya Gatha Abhimanachi

झी युवावर शौर्य गाथा अभिमानाची चे नवे पर्व

एखाद्या गुन्ह्याचा शोध घेताना, सर्वप्रथम गुन्हेगार कोण?  हे समजणं जेवढं महत्वाचं असतं तेवढंच   एखादा गुन्हा घडल्यांनंतर तो गुन्हा दाखल करणे, पंचनामे, साक्षीदार आदी अनेक बारीकसारीक तपशील न्यायालयापुढे नीट मांडणे आणि तद्नुषंगिक कागदपत्रे सादर करणे हे खूप महत्वाचे असते. शौर्य गाथा अभिमानाची या मालिकेने प्रेक्षकांना कायदा आणि सुव्यस्था नक्की कशी असते आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र पोलीस कश्या प्रकारे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गुन्ह्याची उकल करतात हे व्यवस्थित प्रकारे दाखवले गेले आहे .  शौर्य गाथा अभिमानाची या कार्यक्रमाचे आता नवे पर्व सुरु झाले आहे .

पोलिसांच्या रूपातील  सूत्रधार स्वतः प्रेक्षकांना ,  गुन्हा कसा घडला आणि पोलिसांनी शौर्याने गुन्ह्यांची उकल कशी केली हे समर्पक पणे प्रेक्षकांसमोर मांडतो . शौर्य गाथा अभिमानाच्या मागील पर्वात अनेक महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सत्य घटना प्रेक्षकांसमोर आल्या .त्यात इसाक बागवान , राकेश मारिया , वाली शेट्टी , मधुकर झेंडे , सुरेश खोपडे , कल्पना गाडेकर  अश्या अनेक पोलीस पोलीस अधिकाऱ्यांच्या रंजक आणि खऱ्या घटनांमुळे प्रेक्षकांना पोलिसांचे खरे शौर्य समजले .

शौर्य गाथा अभिमानाची च्या नव्या पर्वामध्ये आपण केवळ मोठ्या शहरातील नव्हे तर त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील शौर्यगाथांचा सुद्धा समावेश केला गेला आहे . या शुक्रवारी दिनांक ३१ मार्च रोजी शौर्य गाथा अभिमानाची या मालिकेत पुण्याची अशी एक घटना दाखवण्यात येणार आहे ज्यामध्ये तब्बल १० वर्षानंतर एका पित्याच्या विनंतीवरून मिलिंद गायकवाड या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने , एक जुनी केस पुन्हा ओपन केली . योग्य प्रकारे चौकशी करून गुन्हेगाऱ्याला गजाआड केले आणि ज्यामुळे  एका पित्याला न्याय मिळाला . त्याच प्रमाणे दिनांक १ एप्रिल , शनिवार रात्री  ९ वाजता  पिंपरी चिंचवड मधील अशी एक केस पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांनी तपासली जी पाहिल्यावर भारतीय कुटुंब प्रणाली हादरून जाईल.  हृदयाला पिळवटून टाकणारी ही केस अत्यंत हुशारीने त्यांनाही हाताळली आणि गुन्हेगाऱ्याला जेरबंद केले .

शौर्य गाथा अभिमानाची या मालिकेचे निर्माते क्राईम पेट्रोल मालिका निर्माण करणारे लोटस एंटरटेनमेंट टॉकीज चे विक्रम राय  आणि भूवनेश श्रीवास्तव  हे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शक संजय झणकर आहेत आणि  या मालिकेचे  लेखन  स्वप्नील महालींग यांनी केले आहे. ही मालिका दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता झी युवावर पहायला मिळेल .