झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय . अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम झी युवावर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता पहायला मिळतो. या कार्यक्रमाचे जज लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य हे आहेत . अद्वैत दादरकर हा कार्यक्रमाचा होस्ट असून गंगा आणि अभिनेत्री गायत्री दातार हा शो को होस्ट करत आहेत . या कार्यक्रमात ओंकार शिंदे हा नृत्य दिग्दर्शक असून तो स्पर्धकांसाठी मेंटॉर सुद्धा आहे .या कार्यक्रमात सुरवातीला १४ सेलिब्रिटी डान्सर स्पर्धक होत्या मात्र स्पर्धेच्या स्वरूपातील या कार्यक्रमात आता त्यातील केवळ ९ डान्सर स्पर्धक राहिल्या आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये गिरीजा प्रभू चा प्रवास अतीशय प्रेरणादायी आहे . एक बाल कलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये आलेली गिरीजा आज एक डान्सिंग क्वीन म्हणून व्यासपीठ गाजवतेय . अनेक उत्तोमत्तम परफॉर्मन्स करून ती प्रेक्षकांची लाडकी स्पर्धक बनली आहे .

गिरिजा प्रभू ने असं काही ठरवलं नव्हतं की या मनोरंजन सृष्टीत यायचं. मात्र शाळेमधून गॅदरिंग मध्ये छोट्या डान्स ऍक्ट मध्ये भाग घेत घेत तिची डान्स ची आवड वाढली मग तिने डान्स व्यवसायिक दृष्ट्या शिकायला सुरुवात केली. त्यांनतर अभिनयाच्या कार्यशाळा करत डबिंग चे कोर्स केले . त्यानतंर ऑडिशन द्यायला सुरुवात केली . उमेश कामत आणि प्रिया बापट यांचा टाइम प्लिज या सिनेमात तिला पहिला ब्रेक मिळाला.त्यानंतर क्राईम वर असलेल्या काही मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या . नंतर अंजली व इतर अनेक मोठ्या मालिकांमध्ये मोठ्या कलाकारांबरोबर छोट्या पण चांगल्या भूमिका केल्या. त्यादरम्यान रुद्रम मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी त्यांच्या सिनेमासाठी तिला ऑडिशन देण्यासाठी सांगितले . कौल मनाचा हा तिचा पहिला प्रमुख भूमिकेतील सिनेमा. हजाराहून जास्त मुलींनी त्या रोल साठी ऑडिशन दिली पण शेवटी तिचं सिलेक्शन झालं. त्यानंतर ‘ काय झालं कळेना’ च्या सिलेक्शन ला सुद्धा अनेक मुलींनी ऑडिशन दिली होती मात्र लगेच तिचं सिलेक्शन झालं. एकीकडे अभिनय सुरूच होता मात्र त्यानंतर पुण्यात तिने एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला त्यात ती प्रथम पुण्यात आणि नंतर महाराष्ट्रात दुसरी सौंदर्यवती ठरली . आणि याच मंचामुळे तिला झी युवा वाहिनीचा युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम मिळाला.युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमामुळे ती आज लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि युवा डान्सिंग क्वीन म्हणून गिरीजाची ओळख बनली.

बाल कलाकार ते युवा डान्सिंग क्वीन च्या अनोख्या प्रवासाबद्दल गिरीजाला विचारले असता तिने सांगितले , ” मनोरंजन सृष्टीत येणे कदाचित माझ्या नशिबात होते. मी एक एक गोष्ट करत गेले आणि त्यात मला यश मिळत गेलं . शाळेच्या गॅदरिंगपासून झी युवा च्या ” युवा डान्सिंग क्वीनमध्ये परफॉर्म करणं माझ्यासाठी स्वप्नवत आहे . छबीदार छबी , एमजे ऍक्ट,बंजी ऍक्ट , पोतराज ऍक्ट , टॉप शॉट लावणी असे अनेक प्रकारचे ऍक्ट मी आजवर युवा डान्सिंग क्वीन मध्ये केले आणि अनेक प्रेक्षकांनी मेसेज करून मला शाबासकी दिली.यापुढेही प्रेक्षक मला अशीच साथ देतील ही आशा मी व्यक्त करते ” ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही डान्सची स्पर्धा असली, तरी अशा स्पर्धकांच्या अनेक रंगतदार गोष्टी प्रेक्षकांना पहायला मिळत आहे.

तरुणींच्या दिलखेचक अदाकारीने परिपूर्ण असे नृत्याविष्कार अनुभवण्यासाठी, पाहायला विसरू नका, ‘युवा डान्सिंग क्वीन’, बुधवार ते शुक्रवार, रोज रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर.