होळी म्हणजे जुने वादविवाद सोडून देऊन, रंगांची उधळण करण्याचा सण आहे. आपण विविध सण व उत्सव साजरे करत असतांना, मालिकांमध्येही हे सण साजरे होणे आता प्रेक्षकांसाठी नवीन नाही. निरनिराळ्या विषयांवर आधारित असलेल्या मालिकांमध्ये अग्रेसर असलेली झी युवा ही वाहिनी या होळीच्या उत्सवातही कुठेही मागे नाही. झी युवाच्या वेगवेगळ्या मालिकांमधून होळीचे आगळेवेगळे रंग आपल्याला पाहता येणार आहेत.
‘तू अशी जवळी राहा’, ‘वर्तुळ’ या मालिकांमध्ये मानवी स्वभावाचे व धुळवडीचे आगळे रंग पाहायला मिळतील. काही मालिकांमधील पात्रे, होळीच्या निमित्ताने कटकारस्थान रचताना दिसतील; तर काही मालिकांमधून धुळवडीचा रोमँटिक रंगदेखील पाहता येईल. ही होळी, या पात्रांच्या येणाऱ्या आयुष्यातील रंग कसे बदलते, हे पाहणे मनोरंजक ठरेल. एकंदरच एक रंगीबिरंगी होळी अनुभवण्याची संधी झी युवाच्या प्रेक्षकांना मिळणार आहे.
‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतील राजवीर आणि मनवा यांचा रोमान्स धुळवडीच्या निमित्ताने रंगेल. रंग खेळण्याची इच्छा नसलेला राजवीर, मनवामुळे होळीच्या रंगामंध्ये कसा रंगून जातो, हे पाहायला विसरू नका.२२ मार्च ला संध्याकाळी ७ वाजता तर रात्री ९ वाजता लागणाऱ्या ‘वर्तुळ’ या मालिकेत सुद्धा होळीची धमाल अनुभवता येईल.
तेजससाठी सोहाची होणारी चिडचिड, धुळवडीच्या दिवशी मीनाक्षीला कळणार असलेले विक्रमचे खरे रंग यांचा मिलाफ असलेली रंगांची उधळण पाहता येईल. प्रेम, राग, कपट अशा विविध रंगांनी भरलेले ही मालिकांमधील होळी पाहायला विसरू नका; फक्त आपल्या लाडक्या झी युवावर!!!! झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’ नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.