मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी चित्र गौरव २०१९चा पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडली. यंदा झी गौरव पुरस्कार हे २० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मराठी सिनेसृष्टीचा सन्मान करण्यासाठी लाभलेला हा पहिलाच प्रतिष्ठित मंच.

 

या पुरस्कार सोहळा नेहमीच दिमाखदारपणे आणि भव्यदिव्य असा पार पडतो. गेल्या वीस वर्षात या पुरस्कार सोहळ्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ् यांना सन्मानित केले. मराठी सिनेसृष्टीचा सन्मान करण्यासाठी लाभलेला हा पहिलाच प्रतिष्ठित मंच.

यावर्षी देखील कलाविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०१९’ सोहळ्यात सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली.

सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, मधू चोप्रा, आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, अशोक सराफ, अंकुश चौधरी आणि अशा अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्यात सज्ज होऊन या सोहळ्याची रंगात वाढवली.
हा पुरस्कार सोहळा प्रेक्षक ३१ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहू शकतील.