वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अवघ्या महाराष्ट्रावर आपली छाप पाडणारे चतुरस्त्र अभिनेते मंगेश देसाई लवकरच आता एक वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आजवर त्यांनी प्रेमकथा, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, चरित्रपट अशा विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता मंगेश एका सत्य घटनेवर आधारित ‘हाजरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मंगेश एका बीएमसी कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी मंगेशने खूप मेहनत घेतली आहे.

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे ज्या बीएमसी कर्मचाऱ्यावर आधारित ही कथा आहे त्याची मंगेश देसाई यांनी स्वतः भेट घेतली व या व्यक्तिरेखेचा मंगेश यांनी खूप जवळून अभ्यास केला. कर्मचाऱ्याची ही भूमिका मंगेश यांनी स्वतःमध्ये इतकी भिनवून घेतली कि चित्रीकरणाच्या दरम्यान एक माणूस मंगेशकडे येऊन त्याला काम सांगून गेला. त्या माणसाला मंगेश अभिनेता नसून बीएमसी कर्मचारीच आहे असे वाटले. मंगेशची ही दमदार भूमिका पाहण्यासाठी बघायला विसरू नका ‘हाजरी’ चित्रपट रविवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर