‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधील विनोदवीरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे’जीवनगौरव’ पुरस्कार! दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा पुरस्कार वितरित करण्यात आला. शुभा खोटे आणि विजू खोटे हे यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी ठरले. यंदाचे जीवनगौरव पुरस्कार वितरणनेहमीपेक्षा निराळे आणि हटके होते. ‘बॉलीवूड स्टार’ धर्मेंद्रजी यांच्या हस्ते हे विशेष पारितोषिक देण्यात आले.
धर्मेंद्रजी यांची उपस्थिती या सोहळ्याला अगदी साजेशी अशी ठरली. खास वेळ काढून, लोणावळ्याहून मुंबईत येत त्यांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचेस्वागत करण्यात आले. मुंबई शहराने आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे, या रंगमंचावर देखील आवर्जून सांगायला धर्मेंद्रजी विसरले नाहीत. ‘शोले’ सिनेमात एकत्र काम केलेली ही जोडी, काहीकाळासाठी जुन्या आठवणीत रमली होती.
या चित्रपटातील ‘मैंने आपका नमक खाया हैं’ हा सुप्रसिद्ध संवाद, यानिमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकायला मिळाला. शुभा खोटे व विजू खोटे यांना’जीवनगौरव’ देऊन सन्मानित करत असतांना धरमजींना सुद्धा अभिमान वाटला. धर्मेंद्रजींची या सोहळ्यातील उपस्थिती आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, हा प्रत्येकासाठी आपुलकीचा भाग होता. एकूणच छान जमून आलेला ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०१९’ हा सोहळा, प्रेक्षकांसाठी दुग्धशर्करा योग ठरेल. त्यामुळे पाहायला विसरू नका ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०१९’ रविवार २८ जुलैसंध्याकाळी ६.३० वाजता फक्त आपल्या लाडक्या झी टॉकीजवर.