२०२० हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच फार धक्कादायक होते. सर्वांनीच चांगल्या आणि वाईट गोष्टींचा सामना केला. कोणत्याही संकटांशी दोन हात करण्यासाठी आपण तयार होतो. अखेर हे वर्ष संपत आलेलं आहे. २०२१ ची धडाकेबाज सुरुवात करणसाठी झी टॉकीजने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
३१ डिसेम्बरला काय करायचं? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. २०२०ला निरोप देण्यासाठी आणि २०२१ च्या दमदार स्वागतासाठी झी टॉकीजने २०२१ च्या नावानं चांगभलं या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम यांच्या काही बहारदार नृत्याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीस तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी विनोदाचे बादशाह कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, श्रेया बुगाडे, वविशाखा सुभेदार, प्रियदर्शन जाधव तयार आहेत.
इतकंच नव्हे तर या कार्यक्रमाचे सुचत्रसंचालक शिवराज वायचळ, अमृता देशमुख, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण यांचे अनोखे परफॉर्मन्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.
या कठीण काळात आपण सर्वांनीच स्वतःची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. घरा बाहेर पडून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा घरात बसून या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद घेतलेला कधीही चांगलं.
डान्स, कॉमेडी आणि ड्रामा अशा सर्व गोष्टींनी खचाखच भरलेला हा विशेष कार्यक्रम २०२१ च्या नावानं चांगभलं बघायला विसरु नका ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.