जाणून घ्या, कसा आहे सई ताम्हणकरचा ‘YZ’
- Movie Review : YZ 2016 | वाय झेड
- Director: Sameer Vidwans
- Producers: Sanjay Chhabria and Anish Jog.
- Studio: Everest Entertainment and Pratisaad Productions
- Cast: Sagar Deshmukh, Akshay Tanksale, Parna Pethe and Sai Tamhankar
YZ (2016) Marathi Movie Songs Free Download
‘वाय झेड’ या चित्रपटाविषयी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मग ते कलाकारांची ओळख असो किंवा ट्रेलर प्रत्येक गोष्टीत त्यांनी प्रेक्षकांमध्ये ‘वाय झेड’ विषयी उत्कंठा वाढवली. अखेर तो दिवस आला, ज्याची प्रत्येक जण वाट पाहत आहे. अर्थात हा दिवस म्हणजे नक्कीच ‘वाय झेड’ दिवस असणार.
ट्रेलरमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे खरंच ‘वाय झेड’ ही एक आर्ट आहे, राडा आहे ,धूमाकूळ आहे. ‘वाय झेड’ कोण आहे, काय आहे आणि नेमकं कशाशी संबंधित आहे या सर्व प्रश्नांचा उलगडा या चित्रपटामध्ये होतो.
पहिल्या ‘वाय झेड’ च्या कलाकारापासून सुरुवात करुयात- वाई मध्ये राहणारा आणि पेशाने प्रोफेसर असलेला सरळ-साधा माणूस गजानन म्हणजेच अबब (सागर देशमुख) या पात्रावर आधारित हा चित्रपट आहे. अबब वाईमध्ये इतिहासाचा प्रोफेसर म्हणून कार्यरत असतो. पण काही कारणास्तव त्याची बदली पुण्यात होते आणि या निर्णयाशी अबब आनंदी नसतो.
खरं तर अबब ला नव्या शहरात जाण्याची भिती वाटत असते. अबब कितीही हुशार असला तरी समाजात वावरताना तो थोडासा भित्रा, गोंधळलेला, एकच विचारांचा अशा स्वभावाचा आहे. आणि त्याच्या अशा स्वभावामुळे सुरुवातील पुणे त्याला मानवत नाही. पुण्यात मावशीच्या घरी अबबला राहावं लागते आणि मावशीची मुलगी आरती पण त्याच्याशी नीट बोलत नाही.
पुण्यात पण अबब कॉलेजमध्ये इतिहासाचं लेक्चर देत असतो, पण कोणालाच शिकण्याचा इंटरेस्ट नाही कोणी लक्ष देत नाही असं अबबच्या लक्षात येते आणि तो निराश होतो. निराश आणि गोंधळलेल्या अबबची ओळख होते दुस-या ‘वाय झेड’ पात्राशी म्हणजेच बत्तीसशी (अक्षय टंकसाळे). बत्तीस अबबला प्रत्येक वेळी कूल टाईपमध्ये योग्य मार्गदर्शन करतो. अबबची मावशी त्याच्या लग्नासाठी त्याचे नाव वधू-वरसूचक मंडळात नोंदवते आणि त्यातून लग्नासाठी होकार देणा-या ‘वाय झेड’ पात्राची एंट्री होते. लग्नासाठी होकार देणारी मुलगी असते सरळ-साधी, भोळी-भाबडी पर्णरेखा (सई ताम्हणकर). पर्णरेखा आणि अबब यांच्यामध्ये लग्नाची बोलणी जसजशी सुरु होते तसतसा पर्णरेखाचा स्वभाव अबबला खटकू लागतो. पर्णरेखा सांगेल तसंच वागणं असं मान्य करुन बायकोच्या ताटाखालंच मांजर बनायची इच्छा अबबची नक्कीच नसते. म्हणून तो पर्णरेखाच्या दिसण्यावरुन, वागणुकीवरुन कमी लेखतो आणि संबंध कमी करतो. एकीकडे पर्णरेखाशी संबंध कमी होत जाते तर दुसरीकडे चौथ्या ‘वाय झेड’ पात्र आपलं नशीब आजमावयाला येतं. अंतरा (पर्ण पेठे) हे ‘वाय झेड’ पात्र अबबच्या मावशीच्या मुलीची मैत्रिण असते. सुरुवातीला अंतरा अबबला काका बोलू लागते.
YZ (2016) Marathi Movie Songs Free Download
पण जसजसे अबब संस्कृत भाषेचं शिक्षण देतो तसतसे अंतराला तो आवडू लागतो. पण अबबला हे मान्य नसते कारण अंतरा ही फक्त २० वर्षाची असते आणि अबब तिच्या वयाच्या मानाने बराच मोठा असतो. अंतरालाही अबब नकार देतो. पण शेवटी त्याला भेटते त्याची लहानपणीची मैत्रीण म्हणजेच चित्रपटातलं पाचवं ‘वाय झेड’ पात्र सायली (मुक्ता बर्वे). अबबला सायली विषयी भावना असतात पण तो तिला कधी विचारत नाही. अबबचा एकतर काका टाईप स्वभाव, हुशार जरी असला तरी कायम गोंधळलेला असतो, अशा या अबबच्या आयुष्यात ३ सुंदर मुली येतात.
पण परत अबब त्या मुलींचं मन जिंकेल का? तो कोणाशी लग्न करेल? शेवट पर्यंत अबबला कोणाची सोबत मिळेल, मित्र, प्रेयसी, विद्यार्थी की बालपणीची खास मैत्रीण? या सर्व प्रश्नांचं निरासन ‘वाय झेड’ हा चित्रपट नक्की करेल. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवलेला हा चित्रपट आवर्जुन पाहा.
क्षितीज पटवर्धन यांच्या संवादचं टायमिंग जबरदस्त जुळलंय, अशा शब्दांत सांगायला जास्त आवडेल. प्रत्येक डायलॉगला वेळोवेळी परफेक्ट पंच बसला आहे. समीर विद्वांस याचं दिग्दर्शन सुरेख आहे. बोल्ड सई ताम्हणकरचा एकदम सरळ-साधा अभिनय आहे. जशी पर्णरेखाच्या पात्राला गरज आहे तसाचा शोभेल असा अभिनय सईने करुन परत एकदा प्रेक्षकांना खूश केलंय. सागर देशमुख आणि अक्षय टंकसाळे यांच्या अभिनयात एक भन्नाट एनर्जी पाहता येते. पर्ण पेठे या चुलबुलीने जिंकलं आणि मुक्ता बर्वे… “क्या बात! क्या बात! क्या बात!” जेमतेम १५ मिनिटेचं मुक्ताचा अभिनय आहे पण मुक्ताने कमाल अभिनय केला आहे.
समाजातील व्यक्ती, त्यांचा स्वभाव आणि मानसिकता या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. आपल्या गावातून दुस-या शहरांत जाण्यासाठी मनात होणारी धाकधूक, प्रेमासाठी आणि विवाहासाठी वयाचा केला जाणारा विचार यांसारख्या गोष्टी या चित्रपटात दाखवून प्रेक्षकांसमोर एक ‘वाय झेड’ विचार ठेवला आहे. या चित्रपटातील कथेला आणि कलाकारांच्या अभिनयाला सुंदर जोड मिळाली आहे अर्थपूर्ण गाण्याची.
YZ (2016) Marathi Movie Songs Free Download
‘वाय झेड’ विचार समजून घेण्यासाठी ‘वाय झेड’ कलाकारांच्या अभिनयाने आणि क्षितीज पटवर्धन-समीर विद्वांस या लेखक जोडीच्या कौशल्याने नटलेला ‘वाय झेड’ एकदा तरी नक्की पाहा. आणि ‘वाय झेड’ विचार पटल्यास तुम्ही स्वत:हून परत पाहाल. पण कलाकारांच्या अभिनयासाठी हा चित्रपट नक्की पाहा.