Photocopy Poster

१६ सप्टेंबर ला प्रदर्शित होणार ‘फोटोकॉपी’  Photocopy New Marathi Movie 

 

जागतिक स्तरावर वेगवेगळे विषय आणि दर्जेदार कलाकृती सादर करणारे वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स आपल्या नवीन मराठी सिनेमा ‘फोटोकॉपी’ च्या पारदर्शनासाठी सज्ज आहे. रोमँटिक कॉमेडी पठडीतला हा सिनेमा  यावर्षी दि. १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आजच्या तरुणाईचे भावविश्व टिपणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते विजय मौरया यांनी केले आहे. पौगंडावस्थेत झालेल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘फोटोकॉपी’ हा सिनेमा प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक करणारा ठरणार आहे. या सिनेमात चेतन चिटणीस हा फ्रेश चेहरा मुख्य भूमिकेत दिसणार असून, नाट्य सृष्टीत नावाजलेली अभिनेत्री पर्ण पेठे एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रमुख भूमिका आहे. 

 

Photocopy Marathi Movie Songs Free Download

‘फोटोकॉपी’ हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीत आतापर्यंत कधीही न हाताळल्या गेलेल्या पद्धतीने बनवलेला असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल असा विश्वास वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स चे सीओओ अजित अंधारे यांनी व्यक्त केला. मराठी चित्रपट नेहमीच एका उंचीवर राहिला असून, आता त्याच्या आर्थिक आकडेवाढीमुळे तो अधिकच दर्जेदार आणि उच्च पातळीवर गेला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक हिंदी आणि हॉलीवूड चित्रपटाची निर्मिती करणारे वायाकॉम १८  मोशन पिक्चर्स नेहमीच नवे प्रतिभावंत कलाकार, कथा आणि दिग्दर्शक यांना प्रोत्साहन देत असते असे ही ते म्हणाले.

Use-This-for_press-parna-chetan

Photocopy Marathi Movie Video HD Free Download

आपली पहिलीच निर्मिती असलेल्या ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाचे प्रदर्शन राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत नावाजलेले वायाकॉम १८  मोशन पिक्चर्स सोबत करायला मिळत असल्याबद्दल खूप आनंदी असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्या नेहा राजपाल यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, “मी हे माझे भाग्य समजते की या चित्रपटाद्वारे आम्ही एकत्ररित्या मराठी सिनेसृष्टीला काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्न करू. 

ही केवळ सुरुवात असून, नेहा राजपाल प्रोडक्शन या पुढेही वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स सोबत अशाच आगळ्यावेगळ्या दर्जेदार कलाकृती मराठी प्रेक्षकांसमोर सादर करतील.” या सिनेमाची पटकथा आणि संवाद विजय मोरया आणि योगेश जोशी यांनी लिहिले असून, रोहन म्हापुसकर हे सिनेमाचे कास्टिंग डिरेक्टर आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here