Tu Majha Saangaati – चिन्मय मांडलेकर पंढरपुर वारीतील वारकऱ्यांच्या भेटीला !

978

‘तू माझा सांगाती’ मालिकेमधील तुकाराम – चिन्मय मांडलेकर पंढरपुर वारीतील वारकऱ्यांच्या भेटीला !

कलर्स मराठी आयोजित रंग सावळ्या विठुरायाचा गंध मराठी संस्कृतीचा’ ४ जुलैला संध्या. ६ वा.

प्रत्येक मराठी माणसाचे श्रध्दा स्थान असलेला विठोबा आणि त्याहून पंढरपुरच्या वारीचे डोळ्यात पाणी आणून वाट पहाणारा माणूस यांच्यासोबत या पंढरपुरच्या वारीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच अजून एक वारकारी सहभागी होणार आहे आणि पंढरपुरची हि वारी त्याच्या नजरेतून वारकऱ्यांना पहायला मिळणार आहे.

संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ संत तुकाराम. तुकारामांच्या अंभगवाणीने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील Tu Majha Saangaati  ‘तू माझा सांगती’ या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. याच मालिकेमध्ये संत तुकारामांची व्यक्तिरेखा साकारणार महाराष्ट्राचा लाडका अभिनेता चिन्मय मांडलेकर वारकऱ्यांना भेटायला वारकऱ्यांच्या रुपात जाणार आहे. कलर्स मराठी आयोजित ‘रंग सावळ्या विठुरायाचा गंध मराठी संस्कृतीचा’ या उपक्रमा अंतर्गत वारकऱ्यांना आणि तेथे जमलेल्या भक्तांना चिन्मय मांडलेकरला भेटण्याची संधी संध्या. ६.०० वा. 65 एकर्स (जुना सोलापूर नाका) इथे ४ जुलैला मिळणार आहे.

पंढरपुरच्या या वारीत टाळ आणि मृदुंगअभंगवारीतील विविध खेळअसा भक्तीमय सोहळा असतो. पंढरपुरची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून घरी परतायचे. वारीची हि प्रथा फार जुनी आहे. विठुरायाचे भक्त पंधरा ते वीस दिवस पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनास येतात. संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. याचनिमित्ताने चिन्मय मांडलेकर या वारकऱ्यांना भेटायला जाणार असून या वारीमध्ये चिन्मय अभंग देखील म्हणार आहे ज्यामुळे वारीचे वातावरण अधिकच भक्तीमय होणार आहे. तसेच वारीमध्ये येणाऱ्या दिंडीमधून सर्वात उत्तम दिंडीला कलर्स मराठी तर्फे चिन्मय मांडलेकरच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येणार आहे.

तेंव्हा तुम्ही सुध्दा पंढरपुरच्या वारीचा हा अनोखा भक्तिमय सोहळा चुकवु नका चिन्मय मांडलेकर सोबत  कलर्स मराठी आयोजित ‘रंग सावळ्या विठुरायाचा गंध मराठी संस्कृतीचा ४ जुलै रोजी संध्या. ६.०० वा. 65 एकर्स (जुना सोलापूर नाका) इथे.