टाईमपास हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतला त्याकाळी एक नवा अनोखा प्रयोग ठरला होता. आणि हा सिनेमा त्याच्या अपेक्षांवर खरा उतरला होता, या सिनेमाने नाही म्हणता तब्बल ३३ कोटींपेक्षा अधिक बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला होता. मराठी सिनेसृष्टीत हा आकडा एकप्रकारे अगदी मोठाच होता.

या सिनेमाची तुम्हाला स्टारकास्ट आठवत असेल तर एक नक्कीच आठवेल की यातील प्राजू ही भुमिका निभावणारी अभिनेत्री आहे केतकी माटेगावकर. या सिनेमात प्रथमेश परब व केतकी माटेगावकर यांच्या प्रेमाची भन्नाट केमिस्ट्री आपल्याला पहायला मिळाली होती. भुमिकेंना असलेल्या नावाने अर्थात दगडू आणि प्राजू हे दोघे प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरले होते.

टाईमपास सिनेमाला आता तब्बल सात वर्षे उलटली असताना केतकी माटेगावकर हिला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तोच सोज्वळ साज आणि अगदी साधा भोळा चेहरा असलेली अभिनेत्री नाही तर थोडीश्या ग्लॅमरस रूपातली आणि हटके अशा स्टायलिश लुकमधली प्राजक्ता अर्थात केतकी माटेगावकर पहायला मिळेल.

केतकी सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असल्याने तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. केतकीची खास बात म्हणजे निरागस चेहऱ्यावरील तिचं हास्य, आणि याच हावभावाने एकेकाळी तिने तमाम महाराष्ट्राच्या मनात घर केलं होतं. सध्या आपल्या बोल्ड आणि किलर अदांनी सोशल मिडियावर केतकीने धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळत आहे.

केतकीने सध्या सोशल मीडियावर जे काही फोटो शेअर केले आहेत, त्यांमधील तिचा अंदाज रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. केतकीने शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोत तिच्या कुरूळ्या केसांच्या हेअरस्टाईलचीदेखील सर्व ठिकाणी चर्चा रंगल्याची खबर दिसते आहे. केतकीच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला तिच्या नानाविध अदाकारीच्या फोटोंची झलक पहायला मिळेल हे निश्चित.

केतकी माटेगावकर खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक गायिका आहे आणि त्यानंतर ती एक अभिनेत्री आहे. मुळात अभिनेत्री म्हणून जरी ती अधिक प्रसिद्ध असली तरी तिच्या गायनालाही तोड नाही हे तुम्हाला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील काही व्हिडिओजमधून समजून येईलच. केतकीच्या करियरची खरी सुरूवात करून दिली ती म्हणजे, टाईमपास या सिनेमानेच.

तुम्हाला आठवत असेल तर तानी हा चित्रपटदेखील रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. काकस्पर्श या सिनेमातही केतकीची उत्कृष्ट भुमिका पहायला मिळाली होती. फुंतरू हा तिचा सिनेमा थोडासा फ्लॉप ठरला होता. परंतु तिची फॅन फाॅलोविंग चांगलीच आहे.

शिवाय केतकी सध्या कॅम्पस या आगामी तिच्या हिंदी सिनेमाच्या तयारीत असल्याचीही पहायला मिळते आहे. दशावतार, व्हॉट्स ॲप लग्न, वाय झेड, फोटोकॉपी या सिनेमांकरता केतकीने गायनदेखील केल्याच आपल्याला पहायला मिळतं. याशिवाय आनंदी गोपाळ या उत्कृष्ट मराठी बायोपिक सिनेमासाठीही तिने गीत गायलं आहे. छंद प्रितीचा, कट्टी बट्टी हेदेखील तिच्या गायनाच्या ताफ्यात शामिल होणारे अल्बम आहेत.

केतकी मुळात नागपूर येथील आहे. शिवाय खास बात म्हणजे ती वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून गायनाचं शिक्षण घेत आली आहे. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षी तिचा पहिला गायनाचा अल्बम रेकॉर्ड झाला आहे. तसं पाहता केतकी माटेगावकर मराठी सिनेसृष्टीलाच नाही तर पूर्णत: भारतीय सिनेमासृष्टीला लाभलेलं एक एकमेवाद्वितीय कलागुणसंपन्न व्यक्तिमत्व आहे असं म्हणावं लागेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!