मराठी मध्ये एक चित्रपट खूप गाजला होता. ज्याने मराठी मध्ये करोडों कमवायचा इतिहास केला होता. जो की लव्हस्टोरी वर आधारित असा सिनेमा आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो सिनेमा नेमका कोणता ? तर चला मग जाणून घेऊयात.

टाईमपास हा सिनेमा कुणाला नसेल माहीत. पहिल्यांदा ज्यावेळी आला त्यावेळी त्याने अनेकांना प्रेमात पाडलं. दगडू आणि प्राजु ची प्रेम स्टोरी खूप लोकप्रिय झाली. प्रत्येक प्रेम करणाऱ्याला आपली वाटायची.

 

त्यानंतर पुन्हा रवी जाधव या दिग्दर्शकाने टाईमपास 2 काढला त्यात प्रियदर्शन आणि एक अभिनेत्री होती. तीही केमिस्ट्री खूप गाजली. आणि आता पुन्हा चाहत्यांना प्रेमात पडण्याची झलक घेऊन येतोय टाईमपास 3. होय आणि त्यात नेमकं कोणती अभिनेत्री काम करणार ? याचीही अनेकांची उत्सुकता लागून राहिलेली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

 

केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेल्या टाईमपास या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. या चित्रपटाची कथा, चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यानंतर प्रेक्षकांना काही वर्षांनी टाईमपास २ हा चित्रपट पाहायला मिळाला.

 

या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच प्रियदर्शन आणि प्रियाच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती.

 

आता प्रेक्षकांना टाईमपास ३ पाहायला मिळणार आहे. रवी जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बदाम तिर्रीचे पान शेअर केले होते. तेव्हापासून टाईमपास ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 

टाईमपास ३ साठी अनेक संहिता रवी यांच्याकडे आल्या असून त्यांनी त्यातून एका संहितेची निवड केली असल्याचे म्हटले जात आहे आणि आता तर टाईमपास या चित्रपटात एका अभिनेत्रीची वर्णी लागली असल्याची चर्चा आहे.

 

ती म्हणजे कोण ? तर तुमची आमची आवडती फुलपाखरू मालिकेतील ऋता दुर्गुळे. होय, जी अनन्या नाटकातून अनन्या या रवी जाधव यांच्याच सिनेमात काम करत आहे. जी टाईमपास 3 मध्ये दिसून येणार आहे.

Hruta Durgule

टाईमपास साठी एक जबरदस्त स्टोरी रवी जाधव यांच्याकडे असून आता ते पुन्हा जोरदार तयारीत उतरत आहेत. त्यांच्या या तिसऱ्या यशस्वी प्रयत्नाला चाहत्यांकडून सोशल मीडियावर खूप प्रतिसाद मिळत आहे. रविदादा आणि टीम ला खूप खूप शुभेच्छा.