लॉक डाऊन हा सर्वांना खूप विदारक होता. अनेकांना स्थलांतर करून गावी जावं लागतं होतं. तर काहींना पोटाच्या भुके साठी झगडावं लागत होतं. अश्या संवेदनशील विषयावर एक हिंदी मध्ये बिग बजेट चित्रपट येत आहे. आणि तो साधा सुद्धा दिग्दर्शक नाहीतर खूप लोकप्रिय असे दिग्दर्शक तो चित्रपट साकारणार आहेत. त्यांचं नाव आहे, मधुर भांडारकर.

होय, ते इंडिया लॉक डाऊन हा चित्रपट करत आहेत. ज्याचं पोस्टर ही सोशल मीडियावर शेयर केलं होतं, जे खूप व्हायरल झालं होतं. आणि विशेष म्हणजे त्यात आपल्या मराठी मधील प्रसिद्ध लोकप्रिय अशी हॉट अभिनेत्री काम करणार आहे. आता पुन्हा आपल्याला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री कोण ? तर सई ताम्हणकर. होय तिने तिच्या इंस्टा वरून ही माहिती दिली आहे. तर अजून जास्तीची माहिती आपण खाली सविस्तर जाणून घेऊयात.

 

क’रो’ना’चा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून संपूर्ण देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉक डाउनची घोषणा करण्यात आली होती. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती.

 

आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. याच सर्व परिस्थितीवर एक चित्रपट तयार करण्यात येणार आहे आणि हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असणार आहे.

संवेदनशील विषयांची मांडणी करणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर हा चित्रपट बनवत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सई पुन्हा एकदा हिंदी सिनेमात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.

इंडिया लॉकडाउन’ असं नाव असलेल्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याविषयी सर्वांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरसह प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिकेत दिसतील. चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यापासून सुरू होईल; असं कळतंय. चित्रपटाचं बहुतेक शूटिंग मुंबई आणि आसपासच्या भागात होणार आहे.

तर सर्व टीम आणि सई ला या सिनेमा साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. तिचा हा हिंदी म्हणजेच बॉलिवूड कडे असलेला मोठा प्रवास खूप पुढे जावो. शुभेच्छा. सदिच्छा.